प्रत्येकवेळी रस्त्यावरून लांबचा प्रवास करताना आपल्याला अनेक ठिकाणी टोल भरावे लागतात. त्यामुळे स्वतःच्या गाडीतून लांबचा प्रवास करणे तसे खर्चिक होते. अशावेळी आपल्याकडून टोल आकारला जाऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. टोल भरणे म्हणजे सगळ्यांच्या नाआवडीचे काम कारण त्यामुळे खिसा रिकामा होतो. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील टोल घेण्याची पद्धत पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऊसाने भरलेल्या ट्रकला हत्तीच्या कळपाने अडवलेले दिसत आहे. हत्तींनी या ट्रकला का अडवले आहे असा प्रश्न पडू शकतो. परवीन कासवान यांनी कॅप्शनमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ‘कर आकारला जात आहे’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. ट्रक अडवून टोल म्हणून या हत्तींनी ऊसावर ताव मारला. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : या चुकीमुळे पोलिसाने आकारला पोलिसालाच दंड; Viral फोटो ठरतोय चर्चेचा विषय

परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

हत्तींच्या या टोल आकरण्याच्या पद्धतीवर शेतकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : ‘पाण्यात पाय टाकायचा नाही’ असे सांगताच या कुत्र्यांनी पुढे काय केले एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, आपण निसर्गाचे देणे लागतो हे कायम लक्षात ठेवावे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.