मोठ्या इमारतीमध्ये चढण्यासाठी लिफ्ट खूप फायदेशीर ठरते. अनेक इमारतींना भरपूर मजले असल्याने पायऱ्यांनी वर जाणे काहींना शक्य होत नाही. त्यामुळे लिफ्टचा वापर होतो. वजनदार सामान पोहोचवण्यासाठी किंवा रुग्णाला ने आण करण्यासाठी देखील तिचा उपयोग होतो. मात्र काम हलके करणारी ही मशीन बिघाड झाल्यास किती धोकादायक ठरू शकते याची जाणीव करून देणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत लिफ्ट कशी एका रुग्णासाठी धोकादायक झाली, हे दिसून आले आहे. व्हिडिओत एक व्यक्ती स्ट्रेचरवर असलेल्या व्यक्तीला लिफ्टच्या आत नेत होती. मात्र स्ट्रेचर पूर्णपणे लिफ्टमध्ये शिरण्याच्या आतच लिफ्ट अचानक खाली याऊ लागते. शेवटी स्ट्रेचर लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. या घटनेमध्ये रुग्णाला काही दुखापत झाली की नाही याची माहिती नाही. मात्र ही घटना खरंच अंगावर काटा आणणारी आहे.

(Viral video : टीआरएसच्या नेत्याचा अनोखा प्रताप, लोकांना चक्क कोंबडी आणि मद्याचे केल वाटप, नेटकरी म्हणाले हे तर डायरेक्ट..)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हे कसे झाले असा प्रश्न त्यांनी केला असून स्टाफ आणि रुग्ण दोघांसाठीही प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही घटना भयानक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ही थरारक घटना पाहून कदाचित लोक आता लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी दहावेळा विचार करतील. लिफ्टमध्ये जाता येताना सतर्क राहिलेलेच बरे.