एलोन मस्क आणि त्याची गर्लफ्रेंड, कॅनेडियन गायक ग्रिम्स, तीन वर्षांनंतर “अर्ध-विभक्त” आहेत, असे टेस्ला आणि स्पेसएक्सचे अब्जाधीश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शुक्रवारी प्रकाशित पेज सिक्सने प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये सांगितले. प्रकाशनाने मस्कच्या हवाल्याने म्हटले आहे की, या जोडीने, मे २०१८ मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली होती, चांगल्या अटींवर कायम आहेत आणि X-A-Xii Musk नावाच्या त्यांच्या एका वर्षाच्या मुलाचे सह-पालकत्व करत आहेत. मस्क म्हणाले, “आम्ही अर्ध-विभक्त झाले आहोत पण तरीही एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांना वारंवार भेटतो आणि उत्तम आहोत.”

ते असे म्हणाले की, स्पेसएक्स आणि टेस्ला येथे माझे काम प्रामुख्याने टेक्सासमध्ये असणे किंवा परदेशात प्रवास करणे आवश्यक आहे आणि तिचे काम प्रामुख्याने एलए मध्ये आहे. “ती आता माझ्याबरोबर राहते आणि बेबी एक्स (त्यांचा मुलगा) शेजारच्या खोलीत आहे.”

(हे ही वाचा: https://www.loksatta.com/trending/industrialist-ratan-tata-shares-a-heart-touching-moment-in-the-busy-crowd-of-mumbai-ttg-97-2602007/)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माजी जोडप्याने मे २०२० मध्ये त्यांच्या मुलाचे स्वागत केले. सध्या नवीन गायन स्पर्धा अल्टर इगोच्या जजिंग पॅनलवर असलेल्या ग्रिम्सने अलीकडेच उघड केले की त्यांच्या मुलाने तिला अधिक कलात्मक स्पष्टता दिली आहे. “मला वाटतं की बाळ होणं माझ्यासाठी, कलात्मकदृष्ट्या एक मोठा पुनर्जन्म आहे. ,” या वर्षी मेट गालासाठी सज्ज होत असताना ग्रिम्सने वोगशी बोलतांना सांगितले. मस्कने लेखक जस्टीन विल्सनसह इतर पाच मुल आहेत. १७ वर्षांचे जुळे ग्रिफिन आणि झेवियर आणि १५ वर्षाचे डॅमियन, सॅक्सन आणि काई अशी तीन मुल आहेत.