एलॉन मस्क यांनी ट्विटररची सर्व सुत्र हातात घेतल्यापासून सोशल मीडियावर ट्विटरची जोरदार चर्चा सुरु असते. मस्क हे सतत ट्विटरवरती आपले मतं व्यक्त करत असतात. कधी कधी ते ट्विटरवर पोलही घेत असतात. त्यामुळे मस्क यांची चर्चा सतत सुरु असते. शिवाय ते त्यांच्या धाडसी निर्णयासाठी आणि बिनधास्त वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. या सवयींमुळे त्यांच्यावर अनेकदा ट्रोल होण्याचीही वेळ आली आहे.
अशातच आता त्यांनी सर्वांना कोड्यात टाकणारं एक ट्टिट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, “जर मी माझी कबर खोल खोदली, तर कदाचीत ती पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने बाहेर येईल”, त्यांच्या या ट्विटची चर्चा नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर जोरदार सुरु झाली आहे. इलॉन मस्क यांनी नुकतंच त्यांचे २०१३ मधील एक जुने ट्विट शेअर केले होते. ज्यामध्ये त्यांनी आपण कोणतीही राजकीय टिप्पणी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होत.
हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल
मात्र, त्या ट्विटचा आधार घेत त्यांनी ६ जानेवारीच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘काही सवयी मोडणे खूपच कठीण असते.’ त्यामुळे मस्क यांना राजकीय भाष्य करण्याचा मोह आवरण शक्य नाही, हे स्पष्ट झाल्याचं नेटकरी म्हणाले होते. शिवाय त्यांनी ६ जानेवारीला केलेलं ट्विट हे अमेरिकेच्या राजकारणाशी संबंधित होतं. अमेरिकेतील हाऊस स्पीकरसाठी केव्हिन मॅककार्थीला त्यांनी पाठिंबा दिला होता.
त्याबाबत त्यांनी हे ट्विट केलं होत. त्यामुळे मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून अमेरिकेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केल्याच उघड झालं आहे. शिवाय ५ जानेवारीच्या ट्विटमध्ये मस्क यांनी, “केविन मॅककार्थी स्पीकर असावेत.” असं स्पष्ट मतं व्यक्त केलं होते. अशातच आता आज पुन्हा मस्क यांनी केलेल्या ट्विटची अमेरिकेसह जगभरात चर्चा सुरु झाली आहे. मात्र, त्या ट्विटचा संदर्भ द्या, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? असं नेटकरी कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत. शिवाय या ट्विटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
एका नेटकऱ्याने म्हटलं आहे ‘तुम्ही कबर खूपच खोल खोदली तर ती चंद्रातून बाहेर येईल’, तर एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, ‘बोरिंग कंपनीमध्ये आणखी एक जॉबची निर्मिती झाली आहे.’ तर एका ट्विटर वापरकर्त्याने भन्नाट अशी कमेंट केली आहे. ती म्हणजे, ‘कल्पना करा की तुम्हाला दुसऱ्या बाजूला दुसरा एलॉन सापडला आहे.’ अशा अनेक कमेंट मस्क यांच्या ट्विटखाली लोक करत आहेत.
“मांजरीची पिल्लं दत्तक घ्या आणि मोफत विमान प्रवास करा”; ‘या’ कंपनीची ऑफर होतेय व्हायरल
हे ट्विट आत्तापर्यंत १५ मिलियनहून अधिक वेळा वाचलं गेलं आहे.तर हजारो कमेंट या ट्विटखाली येत आहेत. त्यामुळे मस्क यांना नक्की काय सांगायचं आहे याची उत्सुकता अनेक नेटकऱ्यांना असल्याचं ट्विटला मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसत आहे.