Emotional Video Viral: गरिबी सगळं काही शिकवते, असं म्हणतात. वाईट परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. मग आयुष्यात कितीही संकट आली तरी हार न मानता रडत रडत का होईना त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद अशा परिस्थितीतूनच मिळते. पण जर या सगळ्यात बालपणच हरवलं तर…
ज्यांना आई-वडिल नसतात किंवा ज्यांची परिस्थितीच कठोर असते त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी खूप धडपड करावी लागते. मग अशा परिस्थितीत लहानपणीच खूप शहाणपण येतं. पोटाला काहीतरी मिळावं म्हणून लहान वयातच मूलं काही ना काही करतात. दोन पैसे कमावतात आणि आपली भूक भागवतात. पण काही मूलं जीवघेणा पर्याय निवडून पैसे कमावतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ४ भांवडं पोटाच्या भूकेसाठी अक्षरश: आपला जीव धोक्यात घालताना दिसतायत.
मुलांचा जीवघेणा खेळ व्हायरल व्हिडीओ (Kids Struggle Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की गरिब परिस्थिती असल्यामुळे काही लहान मुलं रस्त्यावर खेळ करतायत. पण हा साधासुधा खेळ नसून जीवघेणा खेळ आहे. एका गोल तारेमध्ये आधी एक मुलगा शिरतो मग त्यामागून एक मुलगी आणि असं करत करत त्या लहानशा तारेत ४ मुलं शिरतात. तारेत जागा नसतानाही असा जीवघेणा प्रयोग करतात जेणेकरून त्यांना दोनवेळचं जेवण तरी मिळेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @shubham_creator_07_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ३.४ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “गरिबी खूप रडवते! पोटाची भूक काहीच पाहत नाही; ना वेदना, ना मेहनत, ना असह्य संकट” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काम करायला भरपूर मार्ग असतात, असले जीवघेणे प्रकार करण्यापेक्षा मेहनत केलेली चांगले असते. फुकटात काही भेटत नसतं.” तर दुसऱ्याने “असं नका करू पोरांनो” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “चुकीचं आहे हे, पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. असं लोकांना भावनिक करून पैसे मिळवण्यापेक्षा कष्ट करून स्वाभिमानाने जगा.” तर एकाने “गरीबी खूप काही करायला लावते” अशी कमेंट केली.