Employees Sleep At Office Video Viral : कार्यालयात नऊ तास काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना थोड्या वेळासाठी आराम करावं, असं वाटत असेल. जर का लंच ब्रेकमध्ये आराम करण्याची संधी मिळाली तर कर्मचाऱ्यांसाठी सोने पे सुहागाच. काही कर्मचारी डोकं खाली करून विश्रांती घेत असतात. पण हा ब्रेक काही मिनिटांसाठीच असतो. नुकतच सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांचा एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्वीटरवर शेअर केला असून यूजर्स या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कर्मचारी कार्यालयात लंच ब्रेकला चादर घेऊन गाढ झोप घेत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

कर्मचारी त्यांच्या डेस्कजवळ आरामात झोप घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही मानात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. चादर अंगावर घेऊन झोपणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहून सोशल मीडियावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या या व्हिडीओला विरोध केला आहे. तर काहिंनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नक्की वाचा – ‘कुरकुरे’ कसे खायचे? उर्फी जावेदने सांगितली खाण्याची पद्धत, यूजर्स म्हणाले, “तू पॅकेटचाही…”

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओला पाहून अंदाज लावता येईल की, हा व्हिडीओ एका कार्यालयाचा आहे. जिथे कर्मचारी त्यांच्या बॅगसोबतत इतर सामान डेस्कवर ठेवताना दिसत आहेत. याचदरम्यान एक महिला कर्मचारी डेस्कवर फोन ठेवत असल्याचं दिसत आहे. डेस्कवर बेड आणि चादर दोन्हीची व्यवस्था करण्यात आल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्वीटरवर हा मजेशीर व्हिडीओ हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. व्हिडीओला शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, काम करण्याच्या जागेवर ही चांगली कल्पना आहे. ९ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज मिळाले आहेत. तर ३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. जपानमध्ये कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची सुविधा दिली जाते, असं सागंण्यात येतं. तेथील कर्मचारी झोपण्यासाठी कार्यालयातच एक तासांची विश्रांती घेतात.