शिक्षण पूर्ण झाल्यांनंतर नोकरी करावी, अशी सर्वसाधारण परंपरा आहे. इंजिनिअरिंगनंतर मोठ्या कंपनीत चांगल्या वेतनावर नोकरी करावी. नोकरीत कष्ट करून वरची पदे मिळवावीत, याकडे बहुतांश तरुणांचा कल असतो. पण सध्या एक चहावाल्या इंजिनिअरचा फोटो व्हायरल होतोय. स्वतच्या समाधानासाठी या पठ्ठ्यानं गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली अन् चहाची टपरी टाकली आहे. आयएएस अवनीश शरन यांनी या तरुणाचा फोटो ट्विटरला पोस्ट केला आहे.

अवनीश शरण यांनी ३० ऑगस्ट रोजी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तुम्हाला इंजिनिअर ते चहावाला याची संपूर्ण कथाच वाचता येईल. या चहावाल्यानं मंदीत संधी कशी शोधावी हे सांगितलं आहे. शाहरुख खान याच्या रईस या प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉग या तरुणाला सूट होतोय. कोणतंही काम लहान नसतं. हे या तरूणानं आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आपण जे काम करतो यात आपल्याला आनंद मिळायला हवा असंही त्यानं आपल्या चहाच्या टपरीवर लिहून ठेवलं आहे.

अवनीश शरण यांनी टपरीचा फोटो पोस्ट करत आपल्या ट्विटरमध्ये लिहिले की, आजच्या घडीला इतकी मेहनत आणि इमानदारी कुठेही दिसून येत नाही. या इंजिनिअर असलेल्या चहावाल्याला आपल्या कामातून आनंद मिळत आहे. या ट्विटवरील पोस्टला आतापर्यंत हजारो जणांनी लाइक केलं आहे. चहाच्या टपरीवर त्या तरुणानं एक मेसेज लिहिलाय. त्यामध्ये त्यानं लिहलेय की, ” मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अनेक कंपन्यांमध्ये काम केलं आहे. पण त्या कामातून मला जे पैसे मिळत होते. त्यातून मी समाधानी नव्हतो. नोकरीत मन रमेना. आपण स्वतः काही तरी सुरू करावे, असा विचार मानात सुरू होता. आपल्या व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असावा, असेही वाटायचं. काम करत असताना चहाचा विषय डोक्यात सुरू होता. तसेच सुरूवातीपासूनच चहाप्रेमी आहे. उत्तम चहा पिण्याची इच्छा नेहमी माझ्या मनात असायची. म्हणूनच मी चहाचं दुकान उघडायचं ठरवलं. ”

आयपीएस अवनीश शरण यांनी चहालाव्या इंजिनिअरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो रातोरात स्टार झाला आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या हिमतीला चांगलीच दाद दिली आहे.