Viral Elephant video : इंटरनेटवर दररोज अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक डान्स व्हिडीओचाही समावेश आहे. व्हायरस व्हिडीओमध्ये कधी दादा, कधी काका किंवा काकू गाण्यांवर नाचताना दिसतात. पण याआधी तुम्ही कधी ढोलाच्या तालावर नाचणारा हत्ती कधी पाहिला आहे का? इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक हत्ती ढोल ताशाच्या तालावर नाचताना असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओ मागील सत्य काय आहे ते जाणून घेऊ या.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला लोक असल्याचे दिसत आहे. हत्तीच्या अंगावर लाल रंगाचे मखमली कापड टाकून सजवण्यात आले आहे. लोक हत्तीभोवती उभे आहेत. काही लोक ढोल ताशा वाजवत नाचत आहे. यासह हत्ती ढोल ताशाच्या तालावर पाय थिरकताना दिसत आहे. उड्या मारताना दिसत आहे. हत्तीभोवती उभे असलेले लोकही हत्तीसह नाचत आहेत. पण व्हिडीओमध्ये दिसणारा हत्ती हा खराखुरा हत्ती नसून हत्तीच्या वेषभुषा परिधान केलेले व्यक्ती आहे. हत्तीच्या आकाराचे कपडे आणि वेशभुषा केल्यामुळे ते हुबेहुबे हत्तीच असल्यासारखे दिसत आहे पण नृत्य पाहून लक्षात येते की हत्ती कधीही अशा प्रकारे नाचू शकत नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.

हेही वाचा –“फाडफाड इंग्रजी बोलतेय ही अशिक्षित महिला!” समुद्र किनाऱ्यावर बांगड्या विक्रेत्या महिलेने जिंकले नेटकऱ्यांचे मन

हेही वाचा – दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्स व्हिडिओवर कमेंट करत आहेत

हत्तीच्या वेषभुषेमध्ये नाचणाऱ्या लोकांचा हा डान्स व्हिडिओ @WokePandemic या हँडलने सोशल मीडिया X वर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले – “केवळ सनातन संस्कृतीच प्राण्यांना आनंदी ठेवू शकते” एका वापरकर्त्याने लिहिले,”सनातन धर्म आणि संस्कृतीचे अलौकिक आणि अद्भुत दृश्य.” एका यूजरने लिहिले, “तुम्ही असा हत्ती यापूर्वी पाहिला आहे का?” एका यूजरने लिहिले,”गणपती बाप्पा मोरया.” हा व्हिडिओ १४ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. युजर्सकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.