Best Books For Women : अनेक लोकांना पुस्तक वाचायची आवड असते. काही लोकांकड पुस्तकांचा मोठा संग्रह सुद्धा असतो. पुस्तक वाचणे ही एक खूप चांगली सवय असून याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. पुस्तक वाचल्यामुळे फक्त आपले ज्ञान वाढत नाही तर आपला वैचारिक दृष्टीकोन सुद्धा बदलतो. अनेकदा कोणते पुस्तक वाचावे, हे कळत नाही. काही वेळा आपण मित्र मैत्रीणींना वाचण्यासाठी चांगले पुस्तकांचे नावं विचारतो. तुम्ही सुद्धा वाचण्यासाठी चांगल्या पुस्तकांच्या शोधात आहात का? आज आपण प्रत्येक स्त्रीने वाचावी अशी दहा पुस्तकं जाणून घेणार आहोत.
untoldkhajina या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक स्त्रीने वाचावी अशी दहा पुस्तकं. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेअर केलेल्या पार्ट १ ला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात, त्यामुळेच कमेंट्स मध्ये सुचवलेल्या आणि मला परिचित असणाऱ्या आणखी काही पुस्तकांचा मिळून हा पार्ट २ सादर केलाय खास तुमच्यासाठी. (पुरुषही ही पुस्तकं वाचू शकतात, बरं का! तुम्हाला नसतील वाचायची तर तुमच्या हक्काच्या महिलांना नक्की गिफ्ट करा”
हेही वाचा : Mango : आंबा खरेदी करताना ही ट्रिक वापरा, एकही आंबा खराब निघणार नाही
स्त्रीने वाचावी अशी दहा पुस्तकं
१. मला उद्धवस्त व्हायचंय – मलिका अमर शेख
२. महाश्वेता – सुधा मूर्ती
३. आहे मनोहर तरी – सुनीता देशपांडे
४. समुद्र – मिलिंद बोकील
५. नॉट विदाउट माय डॉटर – विल्यम हॉफर
६. ब्र – कविता महाजन
७. ही वाट एकटीची – वपु काळे
८. सखी – वपु काळे
९. तारेवरीची कसरत – ललिता गंडभीर
१०. स्मृतीचित्र – लक्ष्मीबाई टिळक
११. गीतांजली श्री – रेक समाधी, अनुवाद सरिता आठवले
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यातली सर्व पुस्तके मी वाचली आहेत. सर्व पुस्तके उत्तम आहेत. फक्त स्त्रियांनी नाही तर पुरुषांनी देखील वाचायला हवीत. ही पुस्तके नक्कीच तुमच्या दृष्टीकोनातून बदल घडवून आणतील.” तर एका युजरने लिहिलेय, “सगळीच सुंदर आहेत पुस्तके” आणखी एका युजरने लिहिलेय, “सावित्रीबाई फुले पण वाचावे महिलांनी”