Bihar Bridge Collapse Viral Video : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया वेबसाइट्सवर, विशेषतः फेसबुकवर, मोठ्या प्रमाणात शेअर होणारा एक व्हिडीओ आढळला. व्हिडीओ आणि त्याच्या स्क्रीनशॉटबरोबर हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, तपासादरम्यान, आम्हाला असे आढळले की, हा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार करण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
सुभाष शर्मा यांनी व्हायरल दाव्यासह एका पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये व्हिडीओत ये-जा करणाऱ्या गाड्यांमध्ये, रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या वर्दळीत एका मोठा पूल कोसळतो असे दाखवण्यात आले आहे आणि या पुलाखाली काही गाड्या सुद्धा चिरडल्या आहेत.

https://www.facebook.com/photo/?fbid=122274396452199660&set=a.122111614718199660
इतर युजर्स देखील तोच व्हिडीओ आणि स्क्रीनशॉट खोट्या दाव्यांसह शेअर करत आहेत.
https://www.facebook.com/groups/760269535519115/posts/1298606811685382
https://www.instagram.com/reel/DMQMSYYuQuQ
तपास:
तपासाच्या पहिल्या टप्प्यात, आम्ही व्हिडीओ जवळून पाहिला आणि त्यात अनेक गोष्टी आढळल्या, ज्यावरून हा व्हिडीओ एआय-जनरेटेड असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आम्ही व्हायरल दाव्यासह शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला एक पोस्ट मिळाली, ज्यामध्ये हा व्हिडीओ एआय-जनरेटेड असल्याचे लिहिले होते.
रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला फेसबुकवर एक पोस्ट मिळाली, ज्यात म्हटले होते की, हा व्हिडीओ एआयचा वापर करून बनवला आहे.
https://www.facebook.com/watch/?v=1465394631284607
त्यानंतर आम्ही व्हिडीओमधील एका स्क्रीनशॉटला एआय डिटेक्टरमधून तपासले. तेव्हा आम्हाला हा व्हिडीओ एआय वापरून बनवला असल्याचे आढळले.

निष्कर्ष: बिहारमध्ये पुल कोसळला हे सांगून व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ एआय जनरेटेड म्हणजेच खोटा आहे.