Cloud Burst Viral Video : सध्या मुंबईत प्रचंड पाऊस पडतो आहे. सगळीकडे पाणी साचल्यामुळे सामान्य माणसांचे ऑफिस, शाळा, कॉलेजला जाताना हाल होत आहेत. यादरम्यान लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ सापडला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पोस्ट करून आणि फॉरवर्ड करून असा दावा करत आहेत की, हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील ढगफुटी झाल्याचा आहे. मात्र, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ मध्य प्रदेशात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी शूट केलेला नव्हता. त्याऐवजी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून तयार करण्यात आला होता; ज्यामुळे तो पूर्णपणे खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
Akram reaction नावाच्या यूट्यूब चॅनेलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच “मध्य प्रदेशात ढग फुटले, विनाशाचे अदृश्य दृश्य”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
इतर सोशल मीडिया वापरकर्तेही हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://www.facebook.com/reel/1759124741374691
तपास:
आम्ही व्हिडीओमधून घेतलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. हा व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला होता.
आम्हाला हा व्हिडीओ ५ ऑगस्ट रोजी ‘कंधाओडिसीसविनेस’ या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलेला आढळला.
https://www.instagram.com/kandha_odysseys_vines
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हे केवळ मनोरंजनासाठी असून एआय जनरेटेड + व्हीएफएक्स-टच्ड काल्पनिक केटेंट आहे.”
आम्ही कीफ्रेम्स एआय इमेज डिटेक्टरमधूनही तपासल्या.
wasitai.com नुसार, कीफ्रेम्स एआय वापरून तयार केल्या गेल्या आहेत.
आम्ही व्हिडीओ ‘HIVE मॉडर्न’मधूनही तपासला, ज्यामुळे हा व्हिडीओ एआयनिर्मित सामग्रीचा असल्याचा निष्कर्ष काढला.
निष्कर्ष
ढगफुटीचा आहे असा दावा केलेला व्हिडीओ मध्य प्रदेशातील नसून एआय-जनरेटेड आहे.