Viral Video Electric Wires Falls On Flooded Street : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत होता. पाण्याने तुडुंब भरलेल्या रस्त्याच्या मधोमध विद्युत तार पडून ठिणग्या उडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नवी दिल्लीतील आहे असा दावा करण्यात आला आहे. पण, आमच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, हा व्हिडीओ नवी दिल्लीचा नसून व्हिएतनामचा आहे आणि जुना सुद्धा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (युजर) सोनू यादवने हा व्हायरल व्हिडीओ त्याच्या प्लॅटफॉर्मवर एका दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आणि “दिल्लीकर मृत्यूला घाबरत नाहीत. म्हणूनच रेखा गुप्ता म्हणाल्या की, जर तुम्ही दिल्लीत आलात तर तुमच्या जबाबदारीने या” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
इतर युजर्स देखील हाच व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर करत आहेत.
https://www.facebook.com/thakur.akash.71619/posts/1515742806283072
https://www.facebook.com/groups/Aimimmimallindiafans/posts/10036097659849625
तपास:
आम्ही व्हिडीओमधील कीफ्रेमचा वापर करून रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने तपास सुरू केला.
हा व्हिडीओ आम्हाला sustainme.in च्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर आढळला आहे.
हा व्हिडीओ ऑक्टोबर २०२४ मध्ये पोस्ट करण्यात आला होता आणि कॅप्शनमध्ये म्हटले होते की, ‘आज व्हिएतनाममध्ये विजेचा खांब पाण्यात पडल्यावर काय घडले बघा’…
आम्हाला व्हिएतनामी वेबसाइट vov.gov.vn वरील एका बातमीसह व्हिडीओचा स्क्रीनशॉट देखील आढळला.
https://vov.gov.vn/clip-hai-hung-day-dien-dut-roi-xuong-duong-ngap-ban-tia-lua-tung-toe-dtnew-1032071?keyDevice=true
१८ ऑक्टोबर २०२४ रोजी अपलोड केलेल्या लेखाचे शीर्षक होते… तुटलेली विद्युत तार तुडुंब भरलेल्या रस्त्यात पडल्याने आगीच्या ठिणग्या सर्वत्र उडू लागल्या.
आम्हाला व्हिएतनामी युट्युब चॅनेलवर देखील व्हिडीओ अपलोड केलेला आढळला.
कॅप्शनमध्ये म्हंटले होते की, ‘विजेची तार रस्त्यावर पडते आणि प्रवाशांच्या शेजारी ठिणग्या उडताना दिसत आहेत’.
निष्कर्ष: पाण्याने तुडुंब भरलेल्या रस्त्यावर थेट विद्युत तार पडल्याने ठिणग्या उडत असल्याचा व्हिएतनाममधील जुना व्हिडीओ, नवी दिल्लीतील अलीकडील असल्याचा सांगून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण, हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.