Video Shows Cheetahs Saving Lady Attacked By A Snake : सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, अनेकदा हे व्हिडीओ एआय जनरेटेडसुद्धा असतात. एआय-जनरेटेड व्हिडीओ हुबेहूब घडणाऱ्या घटनांसारखे दिसतात, त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या घटना खरंच घडल्या आहेत असे म्हणतो. तर लाईटहाऊस जर्नलिझमला असाच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणारा व्हिडीओ आढळला. या क्लिपमध्ये एक नाट्यमय प्रसंग चित्रित झाला आहे, जिथे अजगर एका महिलेवर हल्ला करतो. नंतर चित्ता अजगरावर हल्ला करून महिलेला वाचवतो.
मात्र, आमच्या तपासात असे दिसून आले आहे की, हा व्हिडीओ खरा नसून एआय जनरेटेड आहे. तसेच व्हिडीओ खरा वाटावा यासाठी डिजिटल पद्धतीने तयार केला आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (युजर) @vdmempire ने त्याच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ शेअर करून “व्वा! ती खूपच धाडसी आहे”; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.
इतर युजर्सदेखील हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर करत आहेत.
तपास:
व्हिडीओमध्ये असे अनेक संकेत दिसत होते, ज्यामुळे हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे कळून येते आहे.
जेव्हा अजगर महिलेवर उडी मारतो, तेव्हा दोन्ही दृश्ये एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यामुळे हा व्हिडीओ एआय जनरेटेड असू शकतो. व्हिज्युअलची तीक्ष्णता (sharpness) देखील आणखी एक महत्त्वाचा संकेत आहे.

आम्ही त्यानंतर हा व्हिडीओ AI डिटेक्शन टूल, HIVE मॉडरेटरमध्ये अपलोड केला, तेव्हा व्हिडीओला ९९.८ टक्के स्कोअर देण्यात आला, त्यामुळे व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे समजले.

निष्कर्ष : चित्ता अजगराच्या हल्ल्यातून महिलेला वाचवतानाचा व्हायरल व्हिडीओ एआय जनरेटेड आहे, त्यामुळे व्हायरल होणारा हा व्हिडीओ खोटा आहे.