Woman Was Killed Over Dowry Fact Check Viral Video : लाईटहाऊस जर्नालिझमने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ दिसला. या व्हिडीओत असा दावा केला जातो आहे की, हुंडा न दिल्यामुळे एका महिलेला मारून टाकले आहे. पण, आमच्या तपासात असे आढळून आले की, हा व्हिडीओ टीव्ही मालिकेच्या शूटिंगचा आहे आणि महिलेचा हुंड्यासाठी मृत्यू झाला आहे, असा काहीही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युती @vlogs_adalhat_mirzapur_up_63 ने हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला आहे. “हुंडा न दिल्यामुळे सासरच्यांनी महिलेला मारून टाकले”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
इतर युजर्सदेखील असाच दावा करून हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…
https://www.instagram.com/p/DMQ_xrJiv_I
तपास :
आम्ही व्हायरल व्हिडीओमधील मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
त्यामुळे आम्हाला दोन वर्षांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला.
व्हिडीओवर ‘शूटिंग’, असे लिहिलेले होते.
आम्हाला ‘infocast.co.in’ या वेबसाइटवर व्हिडीओचा एक स्क्रीनशॉट सापडला. त्यावरून व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती अभिनेता साहील खान असल्याचे दिसून आले.
https://www.infocast.co.in/2023/06/saheem-khan.html
त्यानंतर आम्ही अभिनेता साहील खानच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलची तपासणी केली. तेव्हा ८ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘shooting time’ या कॅप्शनसह त्याने एक व्हिडीओ अपलोड केला होता.
निष्कर्ष : टीव्हीवरील मालिकेच्या शूटिंगचा एक जुना व्हिडीओ आता हुंड्यासाठी महिलेला मारून टाकल्याचा दावा करून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.