Elections 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष इच्छुक उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. सत्ताधारी एनडीएला निवडणुकीत टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. यात सत्ताधारी-विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप आणि हेवेदावे करण्यात येत आहेत. त्यात प्रचारसभांसह सोशल मीडियाच्या माध्यामातून राजकीय पक्षांसंदर्भात भ्रम पसरविणारे व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. त्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो विरोधकांनी आयोजित केलेल्या राजकीय सभेतील असल्याचा दावा केला जात आहे. या सभेत लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येतेय. हा व्हिडीओ या वर्षी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. परंतु, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? आणि त्यामागे नेमके सत्य काय आहे ते पाहू.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर Jeetu Burdak ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन पाहा.

https://web.archive.org/web/20240410070956/https://twitter.com/Jeetuburdak/status/1777653857142677900

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड केला आणि व्हिडीओमधून अनेक कीफ्रेम्स मिळवल्या. त्यानंतर आम्ही कीफ्रेमवर एक-एक करून रिव्हर्स इमेज सर्च करायला सुरुवात केली.

त्याद्वारे आम्हाला Hosanna Fellowship च्या फेसबुक पेजवर एक रील सापडली.

या रीलच्या सुरुवातीचा भाग तसाच होता; जो व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शन लिहिलेय की, 47th International Feast of Tabernacle निमित्त Hosanna ministries द्वारा आयोजित कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे.

त्यानंतर आम्ही “47th International Feast of Tabernacle from Hosanna ministries” हा सर्च टर्म वापरून यूट्युब सर्च केले.

या वरून आम्हाला Hosanna Ministries Official हे चॅनेल सापडले.

हा व्हिडीओ एक महिना आधी स्ट्रीम केला गेला होता.

व्हिडीओच्या शेवटी सुमारे 4:48:08 च्या सुमारास व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील दृश्य या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते.

आम्हाला इव्हेंटमधील आणखी काही व्हिडीओ सापडले; जे मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडीओसारखे आहेत.

त्यानंतर आम्ही Hosanna Ministries चा शोध घेतला. आम्हाला आढळले की, Hosanna Ministries (Guntur) हे मंत्रालयांचे भारतातील मुख्यालय आहे.

https://hosannaministries.co/

आम्ही फोन कॉलद्वारे होसन्ना मंत्रालयांच्या मुख्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, हा व्हिडीओ गुंटूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 47 व्या इंटरनॅशनल फेस्ट ऑफ टॅबरनेकलमधील आहे. यावेळी कॉलवर दुसऱ्या व्यक्तीने असेही सांगितले की, गुंटूरमधील कार्यकम्राच्या व्हिडीओवर एक दुसरा ऑडिओ वापर करुन तो व्हायरल केला जात आहे.

निष्कर्ष :

गुंटूरमध्ये आयोजित 47th International Feast of Tabernacle ची ही व्हिडीओ क्लिप विरोधकांच्या रॅलीची असल्याचे सांगून, ती सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतून करण्यात आलेले दावे खोटे आहेत.