Viral Video Of Floods : लाइटहाउस जर्नलिझमला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर होत आहे, असे आढळून आले. काही युजर्सनी हा व्हिडीओ मुंबईतील; तर काहींनी जम्मूतील सध्याच्या पावसाचा असल्याचा दावा करून शेअर केला आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ भारतातील नसून पाकिस्तानमधील कराचीमधला आहे…

काय होत आहे व्हायरल?

@hubmusicworld8120 नावाच्या यूट्यूब चॅनेलने हा व्हिडीओ ‘पूर्ण मुंबईत पाणीच पाणी’, अशी कॅप्शन देऊन शेअर केला आहे. तसेच व्हिडीओत रस्त्यावर भरपूर पाणी साठलं आहे आणि एका माणसाची बाईकसुद्धा वाहून जाताना दिसते आहे.

इतर युजर्स देखील हा व्हिडीओ भारतातील असल्याच्या दावा करून शेअर करत आहेत…

तपास…

आम्ही व्हिडीओमधून घेतलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपासणी सुरू केली.

आम्हाला १९ ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सापडला, ज्यात तो कराचीचा असल्याचे म्हटले होते.

आम्हाला २० ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओ सापडला.

आम्हाला इतर यूट्यूब चॅनेलवर पुराचे काही आणखी असेच व्हिडीओ आढळले.

आम्हाला पाकिस्तान मॅटर्सच्या @PK_Matters एक्स अकाउंटवरही हा व्हिडीओ सापडला.

हा व्हिडीओ टिकटॉकवरही शेअर करण्यात आला होता.

https://www.tiktok.com/notfound

https://www.tiktok.com/notfound

https://www.tiktok.com/notfound

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘आज कराचीतील शाहराह-ए-फैसल नर्सरीमध्ये आलेला गंभीर पूर…’, असे म्हटले आहे.

निष्कर्ष – त्यामुळे पूर आलेला व्हिडीओ मुंबईतील नसून, पाकिस्तानमधील कराचीचा आहे.