Elephant Rescue Child Viral Video : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला; ज्यामध्ये प्राणिसंग्रहालयातील हत्तीच्या आवारात पडलेल्या एका मुलाला हत्तीनं वर उचलून त्याच्या पालकांकडे सोपवल्याचं दिसते आहे. ही घटना खरी असून, ती नुकतीच घडली असल्याचा दावा करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मात्र, तपासानंतर लाईटहाऊस जर्नालिझमला असे आढळले की, हा व्हिडीओ खोटा आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्राणिसंग्रहालयात अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर @shrawan_choudhary_rj23 ने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका हत्तीच्या आवारात बाळ पडले. पण, तो हत्ती देवदूत बनला आणि त्याने निष्पाप मुलाला सोंडेने उचलून कुटुंबाच्या स्वाधीन केले. व्हिडीओतील या दृश्याने लोकांच्या मनाला स्पर्श केला, असे कॅप्शनमध्ये व्हिडीओचे वर्णन करण्यात आले आहे.

इतर युजर्सही असाच दावा करीत हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…

https://www.facebook.com/watch/?v=1192869306008534

https://www.facebook.com/watch/?v=737625822359663

तपास:

आम्ही सर्वांत आधी गूगलवर कीवर्ड सर्च करून, अशी कोणती घटना नुकतीच घडली आहे का ते तपासून पहिले. पण, आम्हाला याबद्दल कोणतीही विश्वसनीय बातमी आढळली नाही.

आम्हाला हा व्हिडीओ Funfact1min नावाच्या YouTube चॅनेलवर १८ जुलै रोजी अपलोड केलेला आढळला.

व्हिडीओवरील टॅगमध्ये हा कन्टेन्ट कृत्रिम पद्धतीने तयार केलेला असल्याचे नमूद केले गेले होते.

या युजर्सने असे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

https://www.youtube.com/@Funfact1min/shorts

त्यानंतर आम्ही हा व्हिडीओ एआय डिटेक्टरमध्ये अपलोड केला.

HIVE Moderation नुसार, हा व्हिडीओ AI जनरेटेड (AI-generated) असण्याची शक्यता ९९.९ टक्के आहे.

Fact check viral video

निष्कर्ष: प्राणिसंग्रहालयात हत्तीने मुलाला वाचवल्याचा व्हायरल व्हिडीओ एआय जनरेटेड आहे.