Viral Video Mother And Child Falling In Waterlogged : सध्या सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी एका व्हिडीओचे सत्य लाइटहाउस जर्नलिजमने तपासून पहिले. व्हायरल व्हिडीओमध्ये, रस्त्यावर प्रचंड पाणी साचलेलं दिसते आहे. यादरम्यान एक कुटुंब बाईकवरून त्या पाणी साचलेल्या रस्त्यावरून जातं असतं. पण, पुढे खड्डा असल्यामुळे गाडीवरून त्याची बायको आणि लहान मुलं खाली खड्यात पडतं. हा व्हिडीओ भारतातील असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण, तपासादरम्यान, लाइटहाउस जर्नलिजमला आढळले की, हा व्हिडीओ पाकिस्तानच्या कराचीमधील आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर ममता राजगड यांनी त्यांच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला आहे आणि ‘आपण रोडचा टॅक्स का देतो’ ; असा प्रश्न विचारून कॅप्शन दिली आहे.

इतर युजर्स देखील हाच व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही तपास सुरू केला आणि व्हिडीओमधील काही मुख्य दृश्यांचे स्क्रिनशॉट घेऊन इनविड (InVid) टूलवर अपलोड केले आणि रिव्हर्स इमेज सर्च (Reverse Image Search) केला.

आम्हाला असे अनेक पोस्ट सापडले ज्यामध्ये हा व्हिडीओ भारतातील नसून पाकिस्तानमधील आहे असे म्हटले जात होते.

आम्हाला एक्स (ट्विटर) वरील पोस्ट देखील सापडल्या; ज्यामध्ये ही घटना पाकिस्तानमधील कराची शहरात घडल्याचे म्हटले होते.

आम्हाला फेसबुकवर अपलोड केलेला एक व्हिडीओ देखील आढळला.

https://www.facebook.com/reel/1145137364148214

हा व्हिडीओ २० ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला होता.

निष्कर्ष: तर खड्ड्यात पडलेल्या आई आणि मुलाचा व्हायरल व्हिडीओ भारतातील नसून पाकिस्तानच्या कराचीमधील आहे. त्यामुळे हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.