भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्टून शोमध्ये डोरेमॉन हा एक आहे. या शोमधील डोरेमॉन, नोबिता, शिजुका हे कायम चर्चेत असतात. लहान मुलांना डोरेमॉन जेवढा आवडतो तेवढाच त्यांना नोबिता देखील आवडतो. नोबिता शिजुकावर किती प्रेम करतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. आता तरी या दोघांनी एकत्र यायला पाहिजे अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे.

शिजुकाला इम्प्रेस करण्यासाठी नोबिता नेहमीच प्रयत्न करत असतो. नोबिताच्या चुकीमुळे नेहमीच शिजुका आणि त्याच्यामध्ये भांडण होतात. पण डोरेमॉनच्या मदतीने नोबिता शिजुकाला इम्प्रेस करण्यात सफल ठरतो. लवकरच डोरेमॉनचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नोबिता आणि शिजुकाचे लग्न होणार आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या डोरेमॉनच्या चित्रपटाचा हा सीक्वेल असणार आहे. या चित्रपटाच नाव ‘Stand by Me Doraemon 2’ असे असणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात डोरेमॉन आणि नोबिताची भेट कशी झाली, त्यांची मजा-मस्ती दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये नोबिता आणि त्याची जिवलग मैत्रिण शिजुका यांचे लग्न होणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२० मध्ये जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर फेब्रुवारी २०२१मध्ये इंडोनेशियात प्रदर्शित होणार आहे. सीबीआय पिक्चर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या नंतर नोबिता आणि शिजूकाचे लग्न सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोरेमॉन, नोबिताचे चाहते ही बातमी ऐकून भावूक झाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “नोबिता आणि शिजुकाचे लग्न होणार. आता आपण सगळे बोलू शकतो की २०२१ हे वर्ष चांगले असणार.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “प्लीज प्लीज मला आता नोबितासाठी रडू अनावर झालं आहे.”