भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपली पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि परिवारासोबत रांची येथील फार्महाऊसवर राहतो आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा केल्यानंतर धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीची पत्नी साक्षीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झिवाच्या मांडीवर एक लहानगं बाळ झोपलेलं असतानाचा एक फोटो पोस्ट केला.
View this post on Instagram
साक्षी धोनीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्येही चांगलाच संभ्रम निर्माण झाला. अनेकांनी धोनी आणि साक्षीला हे तुमचं दुसरं बाळ का?? अभिनंदन…असेही मेसेज केले. साक्षीच्या या फोटोलो ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान वर्षभरासाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या धोनीने आयपीएलसाठी सराव सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर सुविधेत फलंदाजीचा सराव केला. तेराव्या हंगामात धोनी नेहमीप्रमाणे चेन्नईचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे धोनीचे चाहते त्याला मैदानात पुन्हा पाहण्यासाठी आतूर असतील.
अवश्य पाहा – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस