जगात रोज एकतरी विचित्र घटना समोर येत असते. त्या घटनेचा व्हिडिओ किंवा बातमी ऐकल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. आता कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सिदलीपुरा गावातून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. शेतकरी चक्क गायींची तक्रार घेऊन पोलिसात गेला होता. या तक्रारीची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रमैया नावात शेतकऱ्याने पोलिसात दिलेली तक्रार वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्याचे म्हणणे आहे की त्याच्या चार गाई दूध देत नाहीत. गाईंना नियमित चारा देतो, तरीही ती दूध देत नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल करावी. दररोज सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत गायी चरायला घेऊन जातो, असे शेतकऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, चार दिवस उलटून गेले तरी गायी दूध देत नाहीत. अशा स्थितीत गाईंना पोलीस ठाण्यात बोलावून समजावून सांगा असंही त्याने आपल्या तक्रार करताना म्हटलं होतं.

Viral Video: ११ महिन्यांच्या बाळाचा चिकन विंग्सवर ताव; व्हिडिओ पाहून नेटीझन्सही आवाक

शेतकऱ्याची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. अशी विचित्र तक्रार दाखल करता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत शेतकऱ्याला आश्वासन दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे म्हणणे ऐकून शेतकरीही घरी परतला. मात्र या घटनेची जोरदार चर्चा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer complaint against cow for not giving milk rmt
First published on: 08-12-2021 at 12:54 IST