Father Daughter Viral Video: तुफान पावसात सगळीकडे पाणीच पाणी… शाळेबाहेर पालकांची धावपळ… पण त्याच क्षणी दिसलं एक दृश्य जे पाहून अख्खं इंटरनेट थांबून गेलं. एका बापानं जणू पावसालाच हरवलं… मुलीच्या प्रेमापुढे सगळं लहान वाटलं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल…
मुसळधार पावसात रस्ते जलमय झालेले असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, जो कोणीही पाहील तर थेट काळजाला भिडेल. या व्हिडीओमध्ये एक वडील आपल्या लाडक्या मुलीला शाळेतून घ्यायला येतो. सायकलवरून येताना त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्ट दिसत असतात. भरपावसात मुलगी ओली होऊ नये म्हणून तो तिच्या अंगावर टाॅवेल पांघरतो आणि मग तिला सायकलवर बसवून घरच्या दिशेने निघतो.
हा क्षण इतका भावूक करणारा आहे की, तो पाहताना डोळ्यांत नकळत पाणी येतं. बाबाचं प्रेम, त्याची काळजी आणि मुलीसाठी असलेली जबाबदारी हे सर्व काही त्या काही सेकंदांच्या दृश्यातून स्पष्ट जाणवतं.
पावसात भिजू नये म्हणून टाॅवेलमध्ये गुंडाळलेली मुलगी, डोळे भरून येतील हे दृश्य पाहून
या व्हिडीओतून दिसून येतं की, पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साठलेलं आहे. अशा परिस्थितीतही एक बाबा शाळेसमोर सायकलवरून पोहोचतो. नंतर आपल्या मुलीला टाॅवेलमध्ये गुंडाळतो आणि तिला काळजीपूर्वक सायकलवर बसवून निघतो. त्यामध्ये केवळ त्याची घाई नव्हती, तर त्यामागे होती मुलीबाबतची काळजी, त्या काळजीपोटी वाटणारी भीती आणि तिच्यावरचं निस्सीम प्रेम.
आईचंही उदाहरण भावूक करतंय
व्हिडीओमध्ये आणखी एक दृश्य दिसतं – एक आई आपल्या छोट्या मुलाला पावसात भिजू नये म्हणून त्याला थेट पाठीवर घेते आणि चालत जाते. हे दृश्यसुद्धा तितकंच हृदयस्पर्शी आहे.
हा संपूर्ण प्रसंग एका शाळेसमोर राहणाऱ्या व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये टिपला असून, तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोस्टसोबत त्यानं स्वतःच्या भावना व्यक्त करीत लिहिलंय, “आई-वडिलांचं हे प्रेम पाहून मी थक्क झालो, डोळे पाणावले.”
येथे पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया – “हेच असतं खरं प्रेम!”
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी लिहिलं– “हेच खरे हीरो आहेत”, तर कुणी म्हणालं, “आई-वडील आपली स्वतःची चिंता न करता, मुलांची काळजी घेतात, हेच त्यांचं मोठेपण आहे.”
या व्हिडीओनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, जगात सर्वांत नि:स्वार्थी प्रेम कुणाचं असेल, तर ते आई-वडिलांचंच असतं.