Cow Saves Calf from Leopard: जंगलातील कायदे नेहमीच क्रूर असतात; पण कधी कधी निसर्ग आपल्याला धाडस आणि मायेने भरलेले अचंबित करणारे प्रसंगही दाखवतो. व्हायरल व्हिडीओतील त्या क्षणांचे दृश्य इतके झपाटून टाकणारे आहे की… त्यावेळी संपूर्ण जंगलात शांती पसरली आणि नंतर घडला असा एक चमत्कार, जो कोणीही विसरू शकणार नाही. राजस्थानच्या जंगलात एका वासरावर बिबट्याने झडप घेतली होती, मृत्यू त्याच्या अगदी काही इंचांवर होता… पण तेवढ्यात त्याची आई वासराच्या मदतीला धावून आली. हा VIDEO पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
राजस्थानमधील जवई बंध परिसरातील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यात दिसतंय की, एका वासरावर बिबट्यानं हल्ला केला; पण दुसऱ्याच क्षणी एक गाय वेगात धावत आली आणि तिनं बिबट्याला इतका जोरदार दणका दिला की, तो तावडीत सापडलेल्या शिकारीला म्हणजे वासराला सोडून पळून गेला.
काय घडलं नेमकं?
या थरारक व्हिडीओत दिसतंय की, एक वासरू रस्त्यानं चालत असतानाच अचानक झाडीतून एक बिबट्या त्याच्यावर झडप घालतो. बिबट्या वासराच्या मानेला पकडून त्याला फरपटत नेत होता. वासरू जीव वाचवण्यासाठी धडपडत होतं; पण बिबट्याची त्याच्यावरील पकड फारच घट्ट होती. पण त्याच क्षणी, जवळच असलेली गाय, जी कदाचित त्या वासराची आई असावी, ती वासराला वाचवण्यासाठी जोरात धावत आली. तिनं कोणतीही भीती न बाळगता थेट बिबट्यावर हल्ला केला. त्या अनपेक्षित प्रतिकारानं बिबट्यानं वासराला सोडून दिलं आणि तो जंगलात पळून गेला. अपत्याच्या रक्षणासाठी माता भीतीवरही मात करते. एक साधी गाय हिंस्र बिबट्यासमोर उभी ठाकते, तेव्हा त्यातून हेच स्पष्ट होतं. ही केवळ माया नाही, तर ती आहे निसर्गातील खर्या शौर्याची कहाणी.
राजस्थान सफारीदरम्यान टिपलेला व्हिडीओ
ही थरारक घटना जवई बंध, राजस्थान येथील सफारीदरम्यान काही पर्यटकांनी मोबाईलमध्ये शूट केली. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, ही गाय आपल्या वासराला वाचवण्यासाठी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता, थट हिंस्र बिबट्यावर तुटून पडते.
पत्रकार अरविंद शर्मा यांनी हा व्हिडीओ X (पूर्वीचा ट्विटर)वर शेअर करीत लिहिलं, “माझी आई! जेव्हा बिबट्यानं वासऱ्याच्या गळ्याला धरलं, तेव्हा आई धावत आली. आणि मग काय झालं? स्वतःच बघा.”
येथे पाहा व्हिडीओ
या घटनेतून शिकण्यासारखं काय?
हा व्हिडीओ म्हणजे केवळ एका गाईच्या धाडसाचं उदाहरण नाही, तर मायेची खरी ताकद काय असते हेही शिकवतो. हिंस्र बिबट्यासमोरही एक आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते, हे पाहून सगळा सोशल मीडिया भावूक झालाय.