आजकाल सोशल मीडियावर अनेक मजेशीर घटनांचे स्क्रीनशॉट, फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये कधी एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या बॉसकडे रजेसाठी विचित्र अर्ज केल्याचं पाहायला भेटतं, तर कधी कोणी नोकरीसाठी अनोखा अर्ज केल्याचं पाहायला भेटतं, असे व्हायरल अर्ज वाचल्यानंतर अनेकदा लोकांना हसू आवरणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक अर्ज व्हायरल होत आहे. जो वाचल्यानंतर लोकांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

व्हायरल होत असलेल्या अर्ज शनिवारी दुब्बी गांगदवाडी मुख्यमंत्री मदत शिबिरामध्ये एका व्यक्तीने तहसीलदाराला दिला. ज्यामध्ये त्याने मला एकट्याला राहण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मला एक पत्नी उपलब्ध करुन द्यवी, असं लिहिलं आहे. शिवाय त्याने आपणाला कशी बायको पाहिजे हे देखील अर्जात लिहिलं आहे. हा अर्ज ३ जूनचा असून तो दौसा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जातील मजकुरानुसार,महावर नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने तो अर्ज लिहिला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणज तहसीलदारांनी देखील या अर्जाची दखल घेतली आहे. त्यामुळेच ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा- मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतापले कुटुंबीय, थेट सासरी जाऊन लेकीला उचललं अन्…, धक्कादायक Video व्हायरल

हेही पाहा- नातेवाईकांसह मित्रांनी पैसे मागू नये म्हणून काकांनी वापरली भन्नाट ट्रिक; Viral पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, “बरं झालं सांगितलं…”

व्हायरल होत असलेल्या अर्जात लिहिलं आहे की, माझ्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. मी घरी एकटाच असल्यामुळे अस्वस्थ झालो आहे. शिवाय मला घरचे काम करता येत नाही, त्यामुळे घरातील काम करण्यासाठी आणि मला मदत करण्यासाठी बायकोची गरज आहे. माझी विनंती आहे की मला खाली नमूद केल्याप्रमाणे पत्नी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा. पुढे त्याने लिहिलं आहे, “पत्नी पातळ आणि गोरी असावी तसेच तिचे वय ३० ते ४० वर्षांदरम्यान असावे, तिला सर्व कामं यायला हवीत”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राजस्थानी ट्विट’ (@8PMnoCM) नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुव हा भन्नाट अर्ज पोस्ट करण्यात आला आहे. हा अर्ज शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “अतिशय विचित्र विनंती केली आहे.”सध्या हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत ते लिहेपर्यंत ९२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर यावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, खूप गरज आहे, तरीही अटी ठेवल्या आहेत. तर आणखी एकाने “बायको हवी की मोलकरीण” अशी कमेंट केली आहे.