Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक विचित्र घटना व्हायरल होतंय, यामध्ये लोकांनी गंगा नदीकिनारी आढळलेल्या मगरीला बांधून तिची पूजा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मगरीची पूजा होऊ लागली

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील गंगा नदीच्या घाटावर ही घटना घडलीय. च्छिमारांनी मगरीला बांधून मंदिराच्या आतून कोंडून घेतले. त्यामुळे स्थानिक लोकांनी मगरीची पूजा करण्यास सुरुवात केली. तसेच लोकांनी ‘जय श्रीराम’चा जयघोषही केला. लोक अक्षरश: मगरीच्या तोंडाजवळ अगरबत्ती पेटवत होते. यासोबतच मगरीच्या डोक्यावर टिळाही लावण्यात आला. तसेच लोक मगरीच्या जवळ जाऊनही सेल्फी घेताना लोक दिसत आहेत.मगरीला मंदिरात पकडून बांधल्याचा व्हिडिओ @RishabhDixit57या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पहिल्यांदा ड्युटीवर गेलेल्या मुलानं घरी केला व्हिडीओ कॉल; लेकाला वर्दीमध्ये पाहून आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला

लोकांनी पोलिसांना माहिती दिली

मगर पकडल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या पथकाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाला मगरीला अन्य ठिकाणी हलवण्यास सांगण्यात आले. मात्र माहिती दिल्यानंतर 2 तासांनी वनविभागाचे पथक आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तोपर्यंत तेथे लोक जमा झाले आणि त्यांनी मगरीच्या पूजेचा कार्यक्रम सुरू केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fisherman caught crocodile from river ganga locals started worship and taking selfie video viral srk
First published on: 02-02-2024 at 18:46 IST