जगभरामध्ये असे कित्येक देश आहेत जे आपल्या चांगल्या पायाभूत सुविधांसाठी ओळखले जातात. हे देश नेहमी काहीतरी नवीन करण्याचा आणि काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत असतात. असे काही देश आहेत जे काही तरी वेगळे करून जगाचे लक्ष स्वत:कडे वेधण्यात यशस्वी होतात. अशाच उत्कृष्ट पायाभूत सुविधा देणाऱ्या देशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या देशातील आश्चर्यकारक गोष्टीचा व्हिडीओ समोर आला आहे. या देशाने चक्क आकाशात फुटबॉल मैदान बनवले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आकाशात बनवलेले फुटबॉल मैदान दिसत आहे. व्हिडीओ पाहून लोकांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये.
आकाशात बनवले फुटबॉल ग्राऊंड (football ground in sky)
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ चीनमधील Zhejiang नावाच्या शहरातील आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, तुम्हाला फुटबॉलचे मैदान दिसत असेल. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणारे हे मैदान जमिनीवर नसून चक्क आकाशात बांधले आहे. एका मोठ्या जाळीच्या मदतीने हे ग्राऊंड बांधण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन पर्वतांमध्ये असलेल्या दरीमध्ये हे मैदान बनवण्यात आले आहे. दोन्ही पर्वतांना जोडणारा एक छोटा पुलही दिसत आहे. मोठ्या मोठ्या तारांच्या मदतीने मैदानाच्या आकाराची जाळी या पुलावर पसरवण्यात आली आहे. अकाशातील फुटबॉल मैदानावर काही लोक बॉल घेऊन खेळतानाही दिसत आहेत. या मैदानाच्या खाली असलेली दरी पाहून अंगावर काटा येईल.
हेही वाचा – लोको पायलटशिवाय जवळपास ८० किमीपर्यंत रुळावर धावली मालगाडी; टळला मोठा अपघात, थरारक घटनेचा Video Viral
नेटकरी झाले थक्क (Zhejiang Football Ground)
हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @gunsnrosesgirl3 नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १० सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाख ७५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘व्वा, काय गेम आहे.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘माझ्यामध्ये हे करण्याची हिंमत नाही.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘तो पडला तर?’