मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोर्तुगालचा १-० ने पराभव करत फुटबॉल विश्चचषक स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आहे. या पराभवामुळे पोर्तुगालचं विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. दरम्यान या विजयासह मोरोक्को विश्वचषक स्पर्धेची उपांत्यफेरी गाठणारा पहिलाच आफ्रिकन देश ठरला आहे. पोर्तुगालचा पराभव केल्यानंतर मोरोकोच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केलं. मात्र यावेळी एका खेळाडूने आपल्या आईसोबत मैदानावर केलेला डान्स सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरोक्कोचा खेळाडू सुफियानने आपल्या आईसोबत मैदानात डान्स करत विजय साजरा केला. यावेळी दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाल्याची भावना व्यक्त करत आहेत.

रोनाल्डोला वगळण्याचा निर्णय योग्यच -सांतोस

सुफियानने सीबीएस स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. “तिने माझ्यासाठी खूप कष्ट उपसले आहेत, आता तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची वेळ होती,” असं त्याने सांगितलं. दरम्यान मोरोक्को आता अंतिम सामन्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

सुफियानचा त्याच्या आईसोबतचा डान्स पाहिल्यानंतर नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. “अनेक तास प्रवास करत मुलाला प्रशिक्षण केंद्रावर नेणं, त्याच्यासाठी खाऊ बनवणं, स्पर्धांसाठीची तयारी अशा अनेक गोष्टींचं ही आई सेलिब्रेशन करत आहे,” असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

“आईच सर्व काही असते. त्या या सन्मानाच्या पात्र आहेत. याची आठवण करुन दिल्याबद्दल सुफियान तुझे आभार,” असं एका युजरने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football world cup 2022 moroccan footballer sofiane boufal dances with mother after historic win against portugal sgy
First published on: 12-12-2022 at 09:44 IST