भारतासह जगभरात ट्रॅफिक जाम ही एक गंभीर समस्या बनत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या ट्रॅफिकमुळे नागरिकांना रोजचे जीवन जगणे अवघड होत आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसह अनेक मोठ-मोठ्या शहरांमध्ये सकाळ-संध्याकाळ रस्त्यांवर पाहू तिकडे वाहनचं वाहनं दिसतात. अशीच परिस्थिती अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला किंवा गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णास आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती निर्माण झाली तरी तासनतास ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. मात्र, अनेक देशांमधील रस्त्यांवर ट्रॅफिक जाम असले तरी त्यातून रुग्णवाहिका किंवा इतर महत्त्वाची वाहने सहज जाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या एका बाजूने वाहने सुसाट येत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागल्याचे दिसतेय. ही ट्रॅफिक जामची स्थिती असली तरी आपल्या देशासारखी नाही. या ठिकाणी रस्त्याच्या फक्त दोन्ही बाजूने एका रांगेत वाहनं ट्रॅफिक सुटण्याची वाट पाहत आहेत, तर मध्यभागी रस्ता पूर्ण मोकळा आहे. हा मोकळा रस्ता रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस किंवा इतर आपत्कालीन सेवांची वाहने गरजेच्या वेळी सहजतेने जाऊ शकतील यासाठी हे करण्यात आले आहे.

Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसला चक्क कोल्हा, पाहून बाईक स्वार झाले अवाक्; पाहा VIDEO

व्हिडीओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की, लोकांनी किती शिस्तबद्ध पद्धतीने त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केली आहेत आणि मध्येच जागा सोडली आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये वाहतुकीचे नियम सारखेच असल्याचा दावा केला जात आहे.

परदेशातील ट्रॅफिक जामचा हा व्हिडीओ @Rainmaker1973 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘जर्मनीमध्ये असा कायदा आहे की, जेव्हा ट्रॅफिक जाम असते तेव्हा ड्रायव्हरला रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने न्यावी लागतात आणि मधली लेन मोकळा ठेवावी लागते, जेणे करून आपत्कालीन वाहने जाऊ शकतील. पण, अशा प्रकारचे रेग्युलेशन आणि रोड एज्युकेशन प्रत्येक देशात अनिवार्य असले पाहिजे, यामुळे अनेक जीव वाचू शकतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘भारतातही असे वाहतूक नियम लागू केले पाहिजेत, हे खूप आवश्यक आहे.’