Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. कधी डान्स करतानाचे व्हिडीओ तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणी सोशल मीडियावर त्यांची कला दाखवताना दिसतात तर कधी कोणी स्टंट करताना दिसतात. काही लोक लग्नासाठी वर वधू सुद्धा शोधतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी लग्नासाठी मुलगा शोधतेय. विशेष म्हणजे ही तरुणी परदेशी असून हिला लग्नासाठी भारतीय नवरा पाहिजे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विदेशी तरुणी दिसेल. ही तरुणी बस स्टॉपच्या सुचना फलकवर एक पोस्टर लावताना दिसत आहे. हे एका जाहिरातीचे पोस्टर आहे. या जाहिरातीमध्ये लिहिलेय, “भारतीय नवरा शोधतेय” या पोस्टरवर क्युआर कोड सुद्धा आहे.या तरुणीच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटचा हा क्युआर कोड आहे. हा क्युआर कोड स्कॅन करून कोणीही या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊ शकतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डायनारा असे या तरुणीचे नाव असून सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोवर्स आहेत. ती वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून भारताविषयी प्रेम व्यक्त करताना दिसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : गावाकडील चुल घर की शहरातील मॉडर्न किचन? तुम्हाला काय आवडेल? पाहा व्हायरल VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dijidol या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही कोणाला शोधताय का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी मी तयार असल्याचे लिहिलेय तर काही लोकांनी तिला नकार दिला आहे. एका तरुणीने तिचा अनुभव सांगत लिहिलेय, “मला भारतीय बॉयफ्रेंड आहे. तो खूप छान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “इन्स्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्यासाठी एक चांगली ट्रिक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “फॉर्म कुठे फिल करायचा आहे?” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत