आपल्या आवडत्या गाण्यावर ठेका धरणे, नाचणे हे केवळ लहान मुलांनी किंवा तरुण मंडळींनी करावे असा नियम मुळीच नाहीये. मात्र, तरीही जसजसे वय वाढत जाते तसतसे अनेक जण मोकळेपणाने गाणे म्हणणे, नाचणे किंवा खळखळून हसणे विसरत जातात किंवा सर्वांसमोर असे काही करणे त्यांना पसंत पडत नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या ‘गुलाबी साडी’ नावाच्या गाण्यावर नाच करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अगदी चिमुकली मुलंदेखील त्यावर हातवारे करत नाचत आहेत.

मात्र, सुंदर पेहेराव करून मनमोकळेपणाने नाचणाऱ्या चार आजीबाईं या ट्रेंड विजेत्या आहेत, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून shantai_second_childhood या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. वृद्धाश्रमात राहून पुन्हा एकदा बालपण अनुभवणाऱ्या या आजीबाईंनी व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाच्या साड्या नेसल्या आहेत. “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ” या दोन ओळींवर अगदी अचूक हातवारे करून प्रचंड उत्साहाने व्हिडीओमधील चार आजीबाईंनी नाच केला असल्याचे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

हेही वाचा : बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

नाच करताना व्हिडीओमधील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आणि चैतन्य दिसते आहे. या व्हिडीओला “नृत्यातून मिळणाऱ्या आनंदाला वयाचे बंधन नसते; ते आयुष्यातील प्रत्येक क्षणाला मिळवायचे असते, असे या गुलाबी रंग परिधान केलेल्या महिला आपल्याला सांगत आहेत”, अशा आशयाचे कॅप्शन दिलेले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात ते पाहा.

“गुलाबी साडी ट्रेंडचा सर्वात सुंदर व्हिडीओ आहे”, असे एकाने लिहिले आहे.
“याच चौघी या ट्रेंडच्या विजेत्या आहेत…”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“इन्स्टाग्रामवरील सर्वात सुंदर व्हिडीओ आहे”, असे तिसऱ्याने म्हटले आहे.
“हा व्हिडीओ पाहून मला खूप भारी वाटले”, असे चौथ्याने लिहिले.
तर अनेकांनी बदाम आणि बदामाचे डोळे असणारे इमोजी प्रतिक्रिया म्हणून दिले आहेत.

हेही वाचा : Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @shantai_second_childhood नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. याला आत्तापर्यंत ३.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.