स्ट्रॉबेरी हे फळ अत्यंत चविष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. लोकांना स्ट्रॉबेरी खायला फार आवडते. पण सोशल मीडियावर स्ट्रॉबेरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून लोकांना धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहून लोकांना स्ट्रॉबेरी खावी की नाही असा प्रश्न पडला आहे. स्ट्रॉबेरी खाणे खरोखर फायदेशीर आहे का अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मायक्रोस्कोप खाली ठेवलेल्या स्ट्रॉबेरी दिसत आहे.

Fred DiBiase ने X वर एक मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओची सुरुवातीला एक व्यक्ती मायक्रोस्कोप खाली स्ट्रॉबेरी ठेवतो आणि तिचे परीक्षण करताना दिसत आहे. नंतर,मायक्रोस्कोपमधील दृश्य दाखवले आहे ज्यामध्ये लहान कीटक फळांवर रेंगाळताना दिसतात. यामध्ये फळांच्या आतून काही किडेही बाहेर येताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसतो.

हेही वाचा – बोलेरो मॉडेलचा वापर करून तयार केली Driverless Car ! भोपाळच्या स्टार्टअपवर आनंद महिंद्रा झाले खुश!

क्लिपच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “चला दुर्बिणीखाली स्ट्रॉबेरी पाहू.” शेअर केल्यापासून, याला मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर १० दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि १४,०००हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एकाने सांगितले, “हे सर्वांना माहीत आहे की, स्ट्रॉबेरीमध्ये किडे असतात, त्यांना पाण्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा किंवा मीठ २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवा.” दुसऱ्याने लिहिले, “फळातील कीटकांमध्ये प्रथिने असतात.” तिसरा म्हणाला: “मी खूप किडे खाल्ले आहेत…” चौथ्याने लिहिले: “अरे देवा, मी कधीही न धुतलेली फळे खाणार नाही!!”

आउटलेटनुसार, “स्ट्रॉबेरी कॉलोनायझर (Strawberry Colonizer) ही एक ठिपकेदार पंख असलेली ड्रोसोफिला (Drosophila) आहे, एक अतिशय लहान” आक्रमक फळावरील माशी आहे जी स्ट्रॉबेरी आणि इतर बेरीच्या त्वचेखाली अंडी घालडते. “ते अळ्या बनतात आणि त्वचेतून पिनाटासारखे रेंगाळतात. हे पाहणे भितीदायक आहे”

हेही वाचा – मुंबईच्या तरुणीला हवाय नवरा; अट फक्त एकच,”पगार एक कोटी पाहिजे!” नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत

आयोवा कीटकशास्त्रज्ञ डॉन लुईस यांच्या मते, “लार्वा एक इंचाचा एक पन्नासावा भाग असेल – उघड्या डोळ्यांना देखील दिसणार नाही.” त्यांच्या म्हणण्यानुसार, किराणा दुकानात मिळणाऱ्या फळांमध्येही ते असण्याची शक्यता नाही कारण रेफ्रिजरेशनमुळे त्यांचा मृत्यू होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे, हे लहान जीव, जे शेतात पिकवलेले अन्न खाण्यासाठी आवश्यक घटक आहेत, ते खाणे धोकादायक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे फ्लोरिडा विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ श्रीयंका लाहिरी यांनी २०२० मध्ये यूएसए टुडेला सांगितले. वास्तविकता अशी आहे की,”बहुतांश फळे आणि साठवलेली धान्ये काही प्रमाणात कीटकांमुळे संक्रमित होतात ज्यापासून सुटका होणे अशक्य आहे.”