संशोधनात असे दिसून आले आहे की चॉकलेट तुमचा मूड सुधारू शकता, परंतु हैदराबादच्या एका रहिवाशांना कॅडबरी डेअरी मिल्क बारमध्ये बुरशी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोरल आहे. बुरशी लागलेल्या कॅडबरी डेअरी मिल्कचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. याबाबत कॅडबरीची मूळ कंपनी, मॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून प्रतिसाद दिला आहे.

सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर @goooofboll नावाच्या अकाऊंटवरून हैद्राबादमधील एका रहिवाशाने चॉकलेट खाताना त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्याची पोस्ट काही वेळातच ते व्हायरल झाली. विशेष म्हणजे, वापरकर्त्याने हे देखील सांगितले की, हे चॉकलेट जानेवारी २०२४ मध्ये तयार केले गेले होते आणि त्याची एक्सापयरी तारीख अद्याप संपली नव्हती.

आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “या डेअरी मिल्कचे उत्पादन जानेवारी २०२४मध्ये आहे. उत्पादनाच्या १२ महिन्यांपूर्वी एक्सपायरी होती. जेव्हा मी ते उघडले तेव्हा ते असे (बुरशी लागलेले) आढळले. डेअरी मिल्कइन याकडे लक्ष द्वावे.” या पोस्ट ग्राहकाने बुरशी लागलेल्या कॅडबरीचे फोटो शेअर केले आहेत. वापरकर्त्याने चार फोटो पोस्ट केली ज्यात चॉकलेटच्या बिघाडाची व्याप्ती उघड झाली. फोटोंमध्ये पांढरी बुरशी, मागील बाजूस एक मोठे छिद्र आणि वितळलेली दिसत आहे.

हेही वाचा – खेळता खेळता मांजरीने चुकून मालकाच्या घराला लावली आग! ११ लाखांचे सामान जळून खाक

या पोस्टला X वर ६१७. २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे ४.२ लाख लोकांनी लाईक्स केले असून ३०२ जणांनी कमेंट केल्या आहेत.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जिथे एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, “लोक अजूनही भारतात कॅडबरी चॉकलेट्स विशेषतः डेअरी मिल्क का खरेदी करतात आणि खातात? ही भारतीय बाजारपेठेसाठी खराब दर्जाची आणि खराब चव असलेली सर्वात वाईट चॉकलेट्स आहेत.”

आणि आणखी एका ग्राहकाने असाच अनुभव शेअर करताना लिहिले, “मला DairyMilkIn १०० रुपयाच्या चॉकलेट बार बाबत असाच अनुभव आला होता, मला ते फेकून द्यावे लागले, मला त्याची पर्वा नव्हती पण त्यांनी याकडे पाहिले पाहिजे.”

आणि एका वापरकर्त्याने चिंतेवर प्रकाश टाकला आणि कमेंट केली, ‘नवीन भीती अनलॉक झाली कारण मी थेट रॅपरमधून वितळलेले डेअरी दूध खातो आणि त्याकडे पाहत देखील नाही”

हेही वाचा – हद्दच झाली राव! पार्सल परत करण्याच्या नादात चुकून मांजरीलाच बॉक्समध्ये केले पॅक, ६ दिवस अन्न-पाण्याशिवाय….

इतर अनेकांनी शिफारस केली की, “वापरकर्त्याने हे प्रकरण ग्राहक न्यायालयात नेले पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया देताना कॅडबरीच्या कंपनीकडून लिहिले, “”हाय, मॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे कॅडबरी इंडिया लिमिटेड) उच्च दर्जाचे मानक राखण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला एक अप्रिय अनुभव आला याची आम्हाला खेद वाटतो. तुमची चिंता दूर करण्यात आम्हाला सक्षम करण्यासाठी, कृपया आम्हाला या पत्यावर माहिती पाठवा….”