Funny Tattoo Video Viral : हल्ली अंगावर विविध ठिकाणी टॅटू काढून घेण्याची एक फॅशन झाली आहे. काही जण बदलत्या ट्रेंडनुसार नवनवीन टॅटूचे प्रयोग अंगावर करून घेत असतात. पण, स्वस्तात टॅटू काढण्याच्या नादात एका व्यक्तीने आपल्या हाताची चांगलीच वाट लावून घेतली आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल. अनेकांनी त्याचा टॅटू पाहून हा सिंह आहे की कार्टूनमधील शिशिमारु असा मिश्कील सवाल केला आहे.

या व्हिडीओत एका व्यक्ती पैसे वाचवण्यासाठी प्रोफेशन टॅटू आर्टिस्टकडे न जाता रस्त्यावर बसणाऱ्या लोकांकडून टॅटू काढून घेतो. पण, त्याच्या हातावर टॅटूच्या नावाखाली सिंहाच्या जागी असं काही चित्र काढलं जातं की, पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, इतकंच नाही तर पुन्हा अशा लोकांकडे टॅटू काढताना १०० वेळा विचार कराल.

व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती त्याच्या मित्रांना दोन्ही हातांवरील टॅटू दाखवत आहे. त्यापैकी एक टॅटू हा सिंहाचा असतो तर दुसऱ्या टॅटूत भगवान शिवाचा फोटो आहे. हे टॅटू त्याने फक्त ५०० रुपयांत काढून घेतले होते. पण, तो हे टॅटू आपल्या मित्रांना दाखवतो तेव्हा तेही मोठमोठ्याने हसू लागतात.

खरंतर त्या टॅटू कलाकाराने दोन्ही टॅटूच्या डिझाइन अतिशय वाईट काढल्या होत्या. यातून तरी असे दिसतेय की, त्याला टॅटू काढायचा कसा याचे अजिबात ज्ञान नाही. सिंहाचा टॅटू तर अगदी कार्टूनसारखा दिसत होता; तर भगवान शिवाचा टॅटू एखादं लहान मूल चित्र काढावं तसा दिसत होता. असे टॅटू पाहून युजर्सही सल्ला देतायत की, रस्त्यावर कधीही टॅटू काढून घेऊ नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॅटूचा हा हास्यास्पद व्हिडीओ @guru._.07 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून लोक त्या व्यक्तीच्या कंजूषसपणावर हसत आहेत. दरम्यान, अनेक जण त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘५०० रुपयांना टॅटू काढल्यावर असेच घडते, स्वस्त टॅटू काढताना दोनदा दुखते.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘किमान भैयाने प्रयत्न केला.’ शेवटी एकाने लिहिले की, ‘तुम्ही जत्रेत टॅटू काढला का?’