scorecardresearch

Premium

“मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Viral video: रोड ट्रिपमध्ये धमाल मजा आणतात ट्रकच्या मागे लिहिलेले डायलॉग

Funny slogan written behind indian trucks video goes viral on social media
ट्रकच्या मागे लिहिलेले अतरंगी नमुने

Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. पाहुया अशाच काही भन्नाट शायरी. तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Forbes India 30 Under 30 list for 2024 special focus on the remarkable achievements of Five women In different categories
Forbes India: ‘फोर्ब्स’च्या यादीमध्ये या ‘पाच’ प्रसिद्ध अन् यशस्वी महिलांची वर्णी; जाणून घ्या
Man finds worm crawling in orange he bought from Zepto Company issues refund
Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी
Jagadeesh Prathap Bandari released on bail
महिला कलाकाराच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याची जामिनावर सुटका, ‘पुष्पा २’ च्या शूटिंगसाठी सेटवर परतला
A woman saree stuck in the wheel of a two-wheeler a cleaning worker help them Uncle's humanity won everyone's heart Viral Video
दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं, तिला विसरणं शक्य नाही? आणि मिळवणं नशिबात नाही..” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> …अन् पठ्ठ्या वाघाशी भिडला; मात्र वाघ तो वाघच…नडला की तोडलाच, चकमकीचा VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Funny slogan written behind indian trucks video goes viral on social media srk

First published on: 05-12-2023 at 11:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×