Funny video: सोशल मीडियावर रोज चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण हसावे की रडावे ते कळत नाही

महिलांचा राग सर्वांनाच माहिती आहे, त्यांना एकदा राग आला की त्या मग समोरच्याचा बदला घेऊनच शांत बसतात. सहसा त्या कुणाला स्वत: हून त्रास द्यायला जात नाहीत मात्र कुणी उगाच त्यांना त्रास दिला तर समोरच्याचं काही खरं नाही. अशातच आता सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात महिलेने एका कारचालकाला चांगलीच अद्दल घडवल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये एक कार महिलेच्या बाजूने इतक्या वेगाने जाते की तिच्या अंगावर संपूर्ण चिखल उडतो. आपल्या कपड्यांना असं खराब झाल्याचं पाहून महिला संतापते आणि चालकाला धडा देण्याचा निर्धार करते. यानंतर महिला जे करते ते पाहून सर्वच तिच्या हुशारीची प्रशंसा करु लागता. महिलेनं असं काय केलं ते तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार चालक आणि एका मुलीमधील कहाणी लोकांना हसवते आणि विचार करायला लावते. व्हिडिओची सुरुवात एका चिखलाच्या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या कारने होते. रस्त्याच्या कडेला एक मुलगी जात आहे. अचानक, गाडीच्या चाकांमधून चिखल उडतो आणि थेट मुलीवर पडतो. तिचे कपडे खराब होतात आणि तिच्या चेहऱ्यावरही चिखल उडतो. यानंतर महिला प्रचंड चिडते आणि लगेच एक दगड उचलते, पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. थोड्या वेळाने, तीच गाडी परत येते, त्याच मार्गाने. ती मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी राहून गाडी थांबवते. सुरुवातीला ड्रायव्हर थोडा घाबरतो, पण नंतर थांबतो. एकही शब्द न बोलता, ती मुलगी त्याला गाडीतून उतरण्यास सांगते. त्यानंतर स्वत: गाडीत बसते, आणि मग मुलगी ड्रायव्हरच्या सीटवर बसते, इंजिन सुरू करते आणि त्याच चिखलाच्या रस्त्यावरून वेग घेते. काही सेकंदातच चिखल उडतो आणि ड्रायव्हरवरच्या अंगावर पडतो. चिखल अंगावर उडल्यानंतर मुलीला काय वाटलं असेल याचा अनुभव डॅायव्हरला होतो. मुलगी एकदा नाही तर दोनदा हा चिखल त्याच्या अंगावर उडवते आणि अशाप्रकारे बदला घेते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bhavisha333 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.