Shocking video: लोकांना कायमच वन्यजीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून वाघाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील वाघाला घाबरतात. तुम्ही वाघाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान सध्या एका वाघाचा व्हिडीओ समोर आला आहे. वाघ पाण्यात पडला, त्याच्यासमोर नाखवा बोट घेऊन उभाही दिसतो पण या वाघाला वाचवायचं की नाही हा प्रश्न त्याच्या मनात संभ्रम निर्माण करतो. वाघ हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तो अनेक प्राण्यांची शिकार करतो. वाघ फक्त प्राण्यांचीच नाही तर मानवाचीही शिकार करू शकतो अशात त्याच्या जवळ जाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघ पाण्यात बुडताना दिसतो. त्याच्या समोर नाखवा बोट घेऊन त्याला बुडताना पाहत तर असतो पण त्याला वाचवू की नको असा प्रश्न त्याच्या मनात भेडसावत राहतो. वाघाला वाचवले तर त्याचे प्राण वाचेल पण वाघाला वाचवल्यास वाघ त्याची शिकारही करू शकतो. अशात त्याला वाचवणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे. व्हिडिओमध्ये मात्र व्यक्ती पुढच्याच क्षणी एका काठीने वाघाला आपल्या बोटीजवळ खेचताना दिसून येतो. तो त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतो खरा पण वाघ लगेचच त्याला फुंकारतो त्यानंतर व्यक्ती आपली काठी त्याच्यापासून दूर करतो. व्हिडिओमध्ये व्यक्ती वाघाचा जीव वाचवतो की नाही ते स्पष्ट झाले नाही पण हा व्हिडिओ मात्र आता सर्वांना ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाची आठवण करून देत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हिडिओ delhi_ka_ladka_7_4_2025 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.