Funny video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आपल्या बालपणात परत जात आहेत. या व्हिडीओत भाऊ-बहिणीमधला गोड आणि मजेशीर संवाद दाखवला आहे. खरं तर, भाऊ-बहिणीचं नातं हे असंच असतं — थोडं भांडण, थोडं रुसणं; पण त्या सगळ्या नाट्याच्या मागे लपलेलं असतं निखळ प्रेम. या व्हिडीओनं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे आणि लोक म्हणतायत, “अगदी आपल्या घरातलंच सीन आहे हा!”
हा व्हिडीओ एका घरातला आहे, जिथे एक छोटीशी गोष्ट कशी मोठं भांडण बनते हे दाखवलं आहे. भाऊ-बहिणीमधला रोजच्या आयुष्यातला साधा प्रसंग यात दिसतो, जो कोणाच्याही घरात सहज घडू शकतो. सोशल मीडियावर ‘Brother Sister Fight’ नावाने हा व्हिडीओ शेअर होत असून, तो पाहणाऱ्यांना हसवून सोडतो आहे.
व्हिडीओत दिसतं की, एक बहीण आपल्या लहान भावाला पॅन्ट घालायला मदत करीत असते; पण अचानक तो भाऊ तिला एक हलकीशी थप्पड मारतो. हे पाहून बहीण संतापते आणि त्याला ढकलते. पुढच्या काही क्षणांत दोघेही एकमेकांना मारायला लागतात. जरी भांडण थोडं गंभीर वाटत असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि गोडवा सगळ्यांचं मन जिंकतो. काही वेळातच दोघे पुन्हा एकत्र हसताना दिसतात आणि हेच त्यांच्या नात्याचं खरं सौंदर्य आहे. कारण- त्या रागातही प्रेम दडलंय.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स अक्षरशः पोट धरून हसले आहेत. एक युजर म्हणतो, “हे सीन तर प्रत्येक घरात दररोज दिसतात!” दुसऱ्यानं लिहिलं, “भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेमात लपलेली भांडणं आणि भांडणात लपलेलं प्रेम.” काहींनी मजेत लिहिलं, “यांचं भांडण बघता, आज हे भांडण लवकर थांबणार नाही”
लोकांना या व्हिडीओत आपलं बालपण दिसतंय, जेव्हा छोट्या कारणावरून भांडायचो; पण काही क्षणांत पुन्हा हसत बसायचो. म्हणूनच हा व्हिडीओ फक्त मजेशीर नाही, तर भावनांनी भरलेलाही आहे. हा छोटासा, पण गोड व्हिडीओ आपल्याला आठवण करून देतो की, भाऊ-बहिणीचं नातं हे जगातलं सर्वांत सुंदर नातं आहे. एकमेकांवर रागावणं भांडणं; पण काही क्षणांत पुन्हा एकत्र हसणं म्हणूनच लोक म्हणतात की, भांडणातही प्रेम असतं आणि त्यातच या नात्याचं खरं सौंदर्य दडलेलं आहे.”
