Viral video: लग्न म्हटले की हा सोहळा होण्याआधी आणि हा सोहळा झाल्यानंतर बऱ्याच धम्माल गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतात. घरात पाहुणे मंडळी येतात, मग त्यांचा घरातील वावर काही ना काही गंमती जंमती घडवत असतो. कधी आपल्या लग्नाच्या सोहळ्यात वरातीत गंमती जंमती पाहायला मिळतात. अशा गंमती जंमती घडल्याशिवाय लग्नाची मज्जाही वाटत नाही हेच खरे. हल्लीच्या काळात तरुण मंडळी आपल्या मित्रमैत्रिणीच्या लग्नाला हमखास हजेरी लावतात. ज्या मित्राचे लग्न असेल त्याला चिडवणे व त्याच्या होणाऱ्या नवरीवरून टोमणे मारणे असे किस्से घडतात. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. यामध्ये नवरीला प्रेमानं गुलाब देत प्रपोज करायचा प्रयत्न करत असताना नवरदेवाची जी अवस्था झाली, ती पाहून तुम्हाला हसू आवरणं अशक्यच होईल.
आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेल्या सल्ल्यामुळे नवरदेवाची चांगलीच फजीती झाली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेव नवरीला स्टेजवर प्रपोज करायला गुडघ्यावर बसून गुलाब द्यायचं ठरवतो. पण त्याला काही नीट गुडघ्यावर बसताच येत नव्हतं. ‘गुडघ्यावर बसायचं तरी कसं?’ हेच त्याला कळेनासं झालं. दरम्यान, सराव करताना त्याचेच मित्र दोन-तीन वेळा वहिनीला प्रपोज करून दाखवतात. हे सगळं पाहून बिचारी नवरी वैतागते. नवरदेव मात्र स्वत:चं हसं करत मित्रांच्या आग्रहाखातर स्वतःचं हसू करून घेतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतक्रिया देत आहेत. “ अरेंज मॅरेजचा परिणाम असा नवरा मिळाला तर बापरे..” अशी प्रतिक्रियाही व्हिडीओवर आली आहे. तर आणखी एकानं, एकानं म्हंटलंय बापरे काय हे मित्र” अशी प्रतिक्रिया दिली आहे.