Funny Viral Video : दारूसाठी मद्यपी लोक कधी काय करतील ते सांगता येत नाही.अशा नशेबाज लोकांना काही वेळा आपण काय करतोय याचेही भान नसते. अनेकदा ते असे काही वागतात की, ते इतरांना पाहतानाही किसळवाणे वाटते. नशेच्या धुंदीत त्यांना स्वत:चे आणि अवतीभवतीचे भान राहत नाही आणि मग त्यामुळे अशा व्यक्तींना आपण जे काही करतोय, ते योग्य की अयोग्य हे ठरवणे शक्य होत नाही. सध्या सोशल मीडियावर अशा एका नशेबाज व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मद्यपी व्यक्ती भररस्त्यात शिसारी येईल अशी कृती करताना दिसत आहे. या व्हिडीओतल्या दृश्यातील बीभत्सपणा पाहून कोणालाही किळस आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये एक मद्यपी व्यक्ती चक्क रस्त्यावरून वाहणारी दारू चाटून पिताना दिसतोय. त्यामुळे तुम्हालाही दारुच्या आहारी गेलेली एखादी व्यक्ती दारू मिळविण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज येईल.

रस्त्यावर टॉवेल पसरवून चाटून पिऊ लागला वाहती दारू

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी पोलीस जेसीबीच्या साह्याने जप्त केलेली अवैध दारू नष्ट करीत असल्याचे दिसत आहे. पोलीस जेबीसीच्या साह्याने दारूच्या बाटल्या फोडतात आणि त्यामुळे त्या रस्त्यावरून सर्वत्र दारू वाहून जाऊ लागते. याचदरम्यान एक मद्यपी व्यक्ती जेसीबीच्या जवळ येते आणि रस्त्यावर टॉवेल पसरवून, त्या साह्याने वाहती दारू चाटून पिऊ लागते. मद्यपीचा हा किळसवाणा प्रकार पाहून तिथे तैनात असलेला एक पोलीस अधिकारी धावत येतो आणि त्याला मारून तिथून पळवून लावतो. ही व्यक्ती दारूच्या इतकी आहारी गेली होती की, त्याने आजूबाजूचे लोक आपल्याबाबत काय विचार करतील, काय बोलतील याची तमा नव्हती. त्याने चक्क रस्त्यावर टॉवेल टाकून, वाहती दारू पिण्यास सुरुवात केली; पण पोलिसांनी त्याला लगेच पिटाळून लावले. त्यानंतर बाजूला सरकत, तो दारूमध्ये टाकलेला टॉवेल हाताने पिळू लागतो.

हेही वाचा – चालकांनो कारचे टायर विकत घेताय? मग जरा थांबा! आधी ‘हा’ धक्कादायक Video एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @PalsSkit नावाच्या युजरने त्याच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे; ज्यावर लोकांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. कमेंट करीत एका युजरने लिहिले आहे की, लोक दारूसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. दुसऱ्याने लिहिले आहे की, भावा, ही व्यक्ती दारूच्या पूर्णपणे आहारी गेली आहे. तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय की, अशा लोकांना कुठून आणि कशीही करून दारू पाहिजे असते; मग काही होवो. चौथ्याने लिहिले आहे की, पोलीस दारू वाया घालवत होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीने टॉवेलमधून गाळून दारू प्यायली. भारी डेडिकेशन आहे भावा.