Traffic Police Scooty Man Viral Video : सोशल मीडियावर रस्ते वाहतुकीसंदर्भात अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यात कधी अपघाताचे तर कधी वाहतूक पोलिसांबरोबरच्या वादावादीचे व्हिडीओ असतात. याशिवाय ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या लोकांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक स्कुटीचालक चक्क पाच ट्रॅफिक पोलिस समोर उभे असतानाही त्यांना चकवा देत पळून जाताना दिसतोय. ट्रॅफिक पोलिसांपासून वाचण्यासाठी तो असा काही लपाछपीचा खेळ खेळतो की पाहून तुम्हीही शॉक व्हाल, पण यातून तो पोलिसांपासून वाचण्यातही यशस्वी होतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड झालं आहे.
रस्त्यावरून वाहन चालवताना प्रत्येकाने नियम पाळणं बंधनकारक आहे, पण अनेकदा लोक नियम मोडतात आणि ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीत सापडतात. अशाप्रकारे व्हिडीओतही एक स्कुटीचालक नियम तोडून स्कुटी चालवत होता. यावेळी ट्रॅफिक पोलिसांची नजर त्याच्यावर पडते आणि तो पकडला जाणार या भीतीने लपाछपीचा खेळ सुरू करतो. पण, तो काही मिनिटांत असा काही पळ काढतो की पोलिसही पाहत राहतात.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, रस्त्यावर अनेक वाहने त्यांच्या लेनमधून एक एक करून जात आहेत. त्या रस्त्यावर जवळपास सहा लेन आहेत आणि प्रत्येक लेनमध्ये वाहनं रांगेत जात आहेत. या सर्व लेनमध्ये फक्त अवजड वाहनं आणि कार दिसून येतायत, पण एकही बाईक किंवा छोटं वाहन दिसत नाहीयेय. पण, अचानक एक स्कुटीचालक त्या लेनमध्ये शिरतो. यावेळी तिथे उपस्थित पाच ते सहा वाहतूक पोलिस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो कधी एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये, दुसऱ्या मधून चौथ्या लेनमध्ये असा लपाछपीचा खेळ खेळू लागतो. अशाप्रकारे तो पोलिसांना चकवा देण्यासाठी इकडून तिकडे लेन बदलत राहतो. दरम्यान, रस्त्यावर बरीच वाहनं असल्याने वाहतूक पोलिसही त्याच्या जवळ जाऊ शकले नाही. पण, शेवटी तो वाहतूक पोलिसांना चुना लावून तिथून पळ काढतो.
स्कुटीचालकाचा हा व्हिडीओ @confusing_wot नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सिग्मा ड्रायव्हर.’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली की, ५ स्टार रेटिंग ड्रायव्हिंग. दुसऱ्या युजरने लिहिले की, GTA IRL- चायनीज एडिशन.