Funny Wedding Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. पण, त्याहीपेक्षा लग्नानंतरची पाठवणी हा वधूसाठी सर्वांत भावनिक क्षण असतो. कारण- इतकी वर्षं ज्या आई-वडिलांनी प्रेमानं वाढवलं, ज्या भावंडांसह खेळलो त्यांच्यापासून एकाएकी दूर जाणं प्रत्येक मुलीसाठी कठीण असतं. त्यामुळे लग्नात मुलीच्या पाठवणीच्या वेळी आई-वडींल भावंडांसह सगळ्यांच्याच डोळ्यांतून गंगा-यमुना वाहू लागतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्न समारंभातील पाठवणीच्या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला रडू नाही, तर चक्क खूप हसू येईल. कारण- यात पाठवणीच्या क्षणी नवरीचे भाऊ तिच्याबरोबर असं काही करतात की, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

पाठवणीच्या क्षणी तुम्ही पाहिलं असेल की नवरी आई-वडिलांना, भावंडांना मिठी मारून खूप रडते. सर्वांना काळजी घेण्यास सांगते. पण, या व्हिडीओत नवरीच्या रडण्यासह ओरडण्याचा आवाज येतो आणि दोन तरुण तिला जबरदस्तीनं गाडीत ढकलत आहेत. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लग्न समारंभानंतरची पाठवणी सुरू आहे. त्यासाठी लग्नमंडपाबाहेर एक सजवलेली गाडी उभी आहे आणि नातेवाईक व कुटुंबातील लोक पाठवणीची तयारी करत आहेत. वातावरण अगदीच भावनिक झालेलं आहे. पण, पुढे जे घडते, ते पाहून सगळेच हसू लागतात. नवरी कारबाहेर उभी राहून रडतेय आणि जोरजोरात ओरडून सांगतेय, “मला जायचे नाही!” तिच्या आवाजातून अंतरीच्या वेदना सहजपणे जाणवतायत; पण तिचे भाऊ किंवा कदाचित कुटुंबातील लोक तिच्याजवळ येतात आणि जबरदस्तीने तिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतात. त्यावर नवरी दोघांना दूर ढकलून देते, लाथ मारते आणि जोरजोरात ओरडत राहते; पण दोघेही तिला उचलून जबरदस्तीने गाडीत बसवतात. ते पाहताना तो क्षण नवरीच्या पाठवणीचा नाही, तर किडनॅपिंगचा क्षण आहे, असे वाटून जाते. शेवटी तिला कसेतरी कारमध्ये बसवले जाते आणि दरवाजा बंद केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरीसाठी जरी हा कठीण आणि भावनिक क्षण असला तरी ती त्यावेळी जे वागत होती, ते पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण होतं. prajapati.singar नावाच्या एक्स अकाउंटवरून हा हास्यास्पद व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेक जण त्यावर कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलंय की, हे लग्न होतं की अपहरण?, दुसऱ्यानं लिहिलं की, लग्नाच्या नावाखाली इतकी जबरदस्ती? हा भावनिक छळ आहे. तिसऱ्यानं म्हटलं की, जबरदस्तीने नाही, तर आदरानं वधूला निरोप द्या. त्याच वेळी काही लोकांनी हे ‘नाटक’ असल्याचं म्हटलं आहे.