जंगली प्राणी आणि मानवी यांच्याचील संघर्षाचे व्हिडीओ नेहमी समोर येत असतात. कधी जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसतात, पाळीव प्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक रानगवा मानवी वस्तीत शिरल्याचे दिसते आहे. दरम्यान एका व्यक्तीवर रानगव्याने हल्ला केल्याचे दिसते आहे. व्हायरल व्हिडीओ मंगळवारी IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला. व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की,”रानगव्याला हुसकवल्यामुळे त्याने त्या व्यक्तीवर हल्ला केला आहे.”

रानगव्याने केला व्यक्तीवर हल्ला

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, अनेक इशारे देऊनही व्यक्ती रानगव्याला हुसकवात आहे ज्यामुळे तो प्राणी संतप्त झाला. पुढे जे घडले ते त्या व्यक्तीच्या कर्माचे फळ होते. व्हिडीओमध्ये दिसते की कशाप्रकारे रानगव्याने त्या व्यक्तीवर हल्ला केला आहे आणि नंतर त्याला हवेत भिरकावले आहे. या व्यक्तीला अनेक जखमा झाल्या असल्या तरी तो आता सुरक्षित असल्याची माहिती कासवान यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.

हेही वाचा – “मी धोनीसाठी आली आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच

हेही वाचा – वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

IFS अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केली पोस्ट

व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “हिंदीत एक म्हण आहे – आ बैल मुझे मार. येथे व्यावहारिक आहे. इशारा दिल्यानंतरही या व्यक्तीने रानगव्याला हुसकावले ज्यामुळे सर्वांचा जीव धोक्यात आला. रानगवा मानवी वस्तीमध्ये शिरला. आमची टीम पोहोचण्यापूर्वीच हे घडले. आमचे पथक पोहोचले आणि खूप अडथळ्यांनंतर प्राण्याची सुटका केली. विनाकारण वन्यप्राण्यांना भडकावू नका. ते धोकादायक आहे.

हेही वाचून – “अहो ताई, जरा सांभाळून….”, झाडावर चढून नाचतेय ही तरुणी, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

ते म्हणाले, “प्रत्येक वन्यप्राण्यांपासन एक सुरक्षित अंतर ठेवावे लागते. जेव्हा आपण त्याचे उल्लंघन करतो तो त्यांची धोका जाणवतो आणि रानगव्यासारखे जसे प्राणी गोंधळतात आणि त्याप्रमाणे वागतात , ज्यामुळे वन्यप्राणी आणि सामान्य लोकांना दुखापत होऊ शकते. वरील प्रकरणात आमची टीम गर्दीच्या परिसरात कोणालाही मोठी इजा न होता बचाव कार्य करण्यास सक्षम होती.