गणेशोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मूर्तिकार हे मूर्ती घडवण्याच्या कामात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या एका सुंदर मुर्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक मूर्तीकार बाप्पाची भलीमोठी मूर्ती तयार करताना दिसतोय. लक्षवेधी बाब म्हणजे हा मूर्तीकार एका पायानं अपंग आहे. पण तो चक्क एका पायावर उभा राहून हे मूर्ती घडवण्याचं काम करतोय.देवानं त्याला पाय नाही दिला मात्र कला अशी दिली की थेट बाप्पालाच त्यानं घडवलं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजारात एका पेक्षा एक सुंदर अशा गणेश मूर्त्या पाहायला मिळत आहेत. एकेका मूर्तीचा रंग, आकार, चेहऱ्यावरील तेज पाहून खरंच बाप्पाच्या सौदर्याच्या मोहात पडायला होतं. मात्र यामागचे हात आपण कधी बघत नाही, एका मुर्तीमध्ये देव समोरच्याला दिसला पाहिजे अशा पद्धतीने हे मूर्तीकार मूर्ती घडवण्याचं काम करत असतात.

एका दिव्यांग व्यक्तीचा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर चढून त्यावर काम करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा दिव्यांग व्यक्ती धूळ साफ करताना, मूर्तीला फिनिशिंग टच देताना दिसत आहे. हा माणूस स्पंज पाण्यात भिजवताना आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरून साहित्य चालवताना दिसला. मूर्तीवरच आधार घेताना त्यांनी हाताने मूर्ती स्वच्छ केली. अतिशय प्रसिद्ध बाळापूर गणेशच्या कला केंद्रातून ह व्हिडीओ समोर आला आहे. बाप्पावरील प्रेम आणि सेवा व्यक्त करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि त्या व्यक्तीचे कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भयंकर! आधी प्रेमाने जवळ आला, व्यक्तीने हात लावताच थेट लचका तोडला; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vinay__kanna_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत, अनेकांनी या व्यक्तीला सलाम केला आहे तर एकानं “बाप्पाचीच कृपा” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकानं “गणपती बाप्पा मोरया” अशी कमेंट केली आहे.