Gautami patil news photo viral: ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून देखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे.

गौतमीला नेहमी स्टेजवर धुमाकुळ घैलताना आपण पाहिलं आहे मात्र सध्या ती चक्क चुलीवर भाकऱ्या करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, गौतमी चुलीवर भाकऱ्या थापत आहे, बाजुला पारंपारिक पद्धतीची चूल मांडली आहे, त्यावर तवा आहे, चुलीला जाळ घातला आहे, आणि गौतमी भाकऱ्या करते आहे. गौतमी पाटीलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील जेव्हा थापते चुलीवर भाकऱ्या पाहा फोटो

हेही वाचा >> महिलेच्या केसांना कर्ल करण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, गॅस लायटरचा ‘असा’ केला वापर, Video पाहून थक्क व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जाळ आणि धूर संगटच, गौतमीची दुसरी बाजू, सर्वगुण संपन्न गौतमी” अशा अनेक कमेंट्स नेटकरी गौतमीच्या फोटोवर करत आहेत. काही महिन्यांपू्र्वी नृत्य करताना तिने अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती.त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगितलं होतं.