Gautami patil video: राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. लहानापासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वचजण तिच्या अदांवर भाळलेले दिसून येत आहेत. सोशल मीडियावरसुद्धा सतत गौतमी पाटीलच्या नावाचा जलवा पाहायला मिळत असतो.आपल्या डान्स आणि अदांमुळे नेहमीच गौतमी पाटील सध्या यशाच्या शिखरावर आहे. मात्र, एकदोन दिवसात तिच्या कार्यक्रमाची बातमी झाली नाही असं होत नाही. काही ना काही कारणांमुळे गौतमीचा कार्यक्रम चर्चेत येत असतो. गौतमीचे फॅन्स गल्ली बोळातही सहज सापडतील. असं असतानाही एका तरुणानं चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केलीय. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.

व्हिडीओमध्ये गौतमीने दिलेली ऑफर एका तरुणाने रिजेक्ट केल्याचं दाखवण्यात आलंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी मी येत आहे तुम्ही पण या असं म्हणत आहे. त्यावर या तरुणाने व्हिडीओ एडिट करून नको नको असं म्हणत स्वत:चा व्हिडीओ तेथे पोस्ट केला आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर गौतमीची ऑफर त्याने रिजेक्ट केल्याचं वाटतंय. हल्लीची तरुणाई एवढी क्रिएटीव्ह आहे की कधी कधी हे खरंच आहे असं वाटतं. हीच तरुणाई आपली क्रिएटीव्हिटी सोशल मीडियावर शेअर करते आणि ते व्हिडीओ व्हायरल होतात.

या तरुणानं तर गौतमी पाटीलची ऑफर नाकारली मात्र तिचे अनेक चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी व्याकूळ झालेले असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> माहिम जंक्शनचा VIDEO तुफान व्हायरल; नक्की काय घडलं पाहा, मुंबई पोलिसांनाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमी पाटीलला या काही महिन्यांमध्ये अफाट लोकप्रियता मिळाली आहे. गावोगावी लोक तिला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी बोलावत आहेत. तिच्या कार्यक्रमांना गर्दी बघण्यासारखी असते. एकीकडे असं असलं तर दुसरीकडे मात्र गौतमी पाटीलला कॉंट्रोव्हर्सी क्वीनसुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे. कारण गौतमीचा कोणताही कार्यक्रम वादविवादांशिवाय आणि विचित्र प्रकारांशिवाय पार पडतच नाही.