आपलंही स्वत:चं सुंदर घर असावं असं प्रत्येकाचेच स्वप्न असतं. घरांच्या दरांमध्ये झालेली लक्षणीय वाढ पाहता अनेकांनी या स्वप्नांना आवर घातला. तर, काहींनी घराचं स्वप्न पूर्ण केलं. तुमचंही घराचं स्वप्न अर्धवट राहिलं असेल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्हाला एखाद्या सुंदर ठिकाणी राहण्याची ऑफर दिली आणि त्याबदल्यात तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पैसे दिले तर..असंच एक ठिकाण सध्या चर्चेत आलं आहे. जिथं राहण्यासाठी चक्क सरारच तुम्हाला पैसे देत आहे. एक-दोन लाख नव्हे तर तब्बल 49 लाख रुपयांची ही ऑफर आहे.

गावात स्थायिक व्हायचे 50 लाख –

हे असं जर फुकटात घर आणि त्यात राहयचे पैसे मिळत असतील तर तुम्ही म्हणाल हे असं खरचं आहे का? तर हो स्विझरलँडमध्ये असे एक गाव आहे, जिथे सरकार लोकांना गावात स्थायिक होण्यासाठी अशी ऑफर देत आहे. मात्र यामागे कारण असं आहे की गेल्या काही वर्षांपासून या गावातील लोक हे गाव सोडून जात आहे. इथं काही मोजकेच लोक राहत आहेत. या गावाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार 2018 सालापासूनच लोकांना पैसे ऑफर करत आहेत. या गावात राहण्यासाठी भारतीय चलनानुसार 49 लाख 26 हजारपेक्षाही जास्त पैसे मिळू शकतील. यात जर तुमचं चार सदस्यांचं कुटुंब असेल तर प्रत्येक प्रौढ सदस्याला 22 लाख रुपये आणि लहान मुलांना 8 लाख रुपये दिले जाणार आहेत. आता हे गाव कोणतं आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. हे गाव आहे अल्बिनेन, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. वलाइस प्रांतात फ्रान्स आणि इटलीच्या सीमेवर आहे.

काय आहेत अटी –

तुम्ही तिथे जाऊन स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर गावात राहण्याच्या ऑफर्ससह काही अटीही आहेत. जी तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तरच हे पैसे हातात येतील. या ऑफरची अट अशी आहे की, फक्त 45 पेक्षा कमी वयोगटातील लोकांसाठीच ही ऑफर आहे. अर्ज करणारा स्विस नागरिक हवा. ज्याला परमिट मिळालेलं असावं. जर तुम्ही या गावात दहा वर्षे राहिलात तर घराची किंमत वाढेल पण त्याआधीच ही जागा सोडली तर हीच रक्कम तुम्हाला परत द्यावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा –

MBA चहावाल्यानंतर मार्केटमध्ये ‘बीटेक’ पाणीपुरीवाली चर्चेत, ‘या’ कारणानं ग्राहक लावतायत रांगा