Crocodile in Andaman and Nicobar: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात तब्बल २० फुटांपेक्षा जास्त लांबीची मगर समुद्रात आरामात पोहताना दिसत आहे. या राक्षसी मगरीला ‘पोर्ट ब्लेअर जायंट’ असे नाव देण्यात आले आहे, कारण ती अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर ( ‘श्री विजयपूरम’ ) च्या समुद्रकिनारी दिसल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओ पाहणारे लोक अक्षरशः थक्क झाले आहेत, कारण इतक्या मोठ्या आकाराची मगर अत्यंत दुर्मीळ मानली जाते. मात्र, वनविभाग किंवा वैज्ञानिकांकडून याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही आणि त्यामुळे रहस्य अजून गडद झाले आहे.
अंदमानच्या निळ्याशार लाटांमध्ये अचानक एक प्रचंड सावली तरंगताना दिसली. काही क्षणांनी त्या सावलीचं भयानक रूप स्पष्ट झालं. तब्बल २० फुटांहून मोठी, जगातील सर्वात धोकादायक मगर. लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता… हा ‘पोर्ट ब्लेअर जायंट’ खरोखर आहे का, की फक्त एक अफवा? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि आता मगर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय. लोक घाबरत आहेत, तज्ज्ञ चकित आहेत आणि सत्य अजूनही पाण्याखाली लपलेलं आहे…
इतकी मोठी मगर, कसे शक्य आहे?
मगर ही पाण्यात आणि जमिनीवर राहणारी सर्वात धोकादायक उभयचर प्राणी आहे. तिच्या तावडीत एकदा का कोणी सापडले तर तिच्यापासून सुटका होणे कठीण आहे. मगर ही आपल्या मोठ्या जबड्याने शिकार करते आणि तिच्या जबड्यात इतकी ताकद असते की, ती कोणत्याही मोठ्या प्राण्याचेसुद्धा लचके तोडू शकते.
साधारणपणे खाऱ्या पाण्यातील मगर १४ ते १७ फूट लांब असतात, पण काही अपवादात्मक घटनांमध्ये ते २० फुटांपेक्षाही मोठे होऊ शकतात. अंदमानच्या बंगालच्या उपसागरात मूंगा चट्टानांची भरमार आणि सागरी जीवसृष्टी मुबलक प्रमाणात आहे, जी मगरींसाठी अत्यंत अनुकूल ठरते. जैव-विविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या परिसरात प्रचंड आकाराची मगर दिसणे फारच दुर्मीळ असले तरी अशक्य नाही. मात्र, ‘पोर्ट ब्लेअर जायंट’चा आकार पाहून अनुभवी लोकसुद्धा थक्क झाले आहेत.
मगरींची वाढती संख्या आणि धोका
१९७० च्या दशकात अंदमान बेटांवर फक्त ३१ मगर होते. पण, संरक्षण उपायांमुळे आता त्यांची संख्या तब्बल ५०० च्या घरात पोहोचली आहे. अशा राक्षसी मगरींचे अस्तित्व स्थानिकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. जर हा व्हिडीओ खरा ठरला तर ही मगर अत्यंत धोकादायक असू शकते. अशावेळी वनविभागाकडून तिला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची शक्यता आहे, जसे उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी पूर्वी करण्यात आले आहे.
वनविभागाची मोठी कसोटी
या व्हायरल व्हिडीओच्या सत्यतेचा शोध घेण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू करणे गरजेचे आहे. लोकांची सुरक्षितता आणि मगरींच्या संरक्षणामध्ये योग्य समतोल राखणे ही मोठी जबाबदारी असेल. अंदमानमध्ये मगर व्यवस्थापनासाठी आधीच काही योजना सुरू आहेत, पण जर ‘पोर्ट ब्लेअर जायंट’ खरोखर अस्तित्वात असेल, तर त्याचे संरक्षण करताना लोकांना सुरक्षित ठेवणे हे अभूतपूर्व आव्हान ठरेल.
येथे पाहा व्हिडीओ
आता प्रश्न फक्त एकच हा व्हिडीओ खरा आहे का, की फक्त अफवा?
सत्य लवकरच समोर येईल, पण तोपर्यंत ‘पोर्ट ब्लेअर जायंट’चे रहस्य लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल पसरवत राहणार आहे.