मगर ही पाण्यात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीला पाण्यातील सर्वात शक्तिशाली आणि प्राणघातक प्राणी म्हटलं जातं. कारण ती पाण्यात हत्ती सारख्या प्राण्यांनादेखील पराभूत करते. शिवाय कोणत्याही प्राण्याला ती आपल्या शक्तिशाली जबड्यात अडकवून मारुन टाकते. शिवाय पाण्याबाहेर तिची ताकद जास्त काळ टीकू शकत नाही असं म्हणतात, पण सध्या सोशल मीडियावर मगरीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी मगर पाण्यात आणि पाण्या बाहेरदेखील तेवढीच शक्तीशाली असते असं म्हणत आहेत.

कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्य अशाच प्रकारची आहेत, जी पाहून तुम्हीही मगरीच्या पाण्याबाहेरच्या शक्तीला नाकारु शकत नाही. या व्हिडीओमध्ये एक भयानक आणि शक्तीशाली मगर आपल्या ताकदीने एका कुंपणाला लावलेले लोखंडी रॉड सहज तोडून कुंपणाच्या पलिकडे जाताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय अनेकजण घाबरले आहेत. कारण अनेक प्राणीसंग्रहालयांमध्ये मगरींना अशाच लोखंडी रॉडच्या कुंपणात ठेवलेलं असतं, त्यामुळे मगर जर हे कुंपणं इतक्या सहजतेने तोडत असे तर मग हे पर्यटकांसाठी धोकादायक असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- घरातून ऑफिसला निघालेल्या व्यक्तीला लिफ्टजवळच मृत्यूने गाठलं; हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

हेही पाहा- बिबट्याने घरात घुसून कुत्र्यावर केला हल्ला; व्हायरल CCTV फुटेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मगरीने तोडलं लोखंडी कुंपण –

या शक्तीशाली मगरीचा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक भयंकर मगर स्टीलच्या रॉडच्या कुंपणाजवळ फिरताना दिसत आहे, त्यानंतर अचानक ती स्टीलच्या रॉडने बनवलेल्या कुंपणामध्ये तोंड घालते ज्यामुळे कुंपणाचे लोखंडी रॉड वाकतात आणि मगर त्यातून सहजपणे निघून जाते.

व्हिडिओ झाला व्हायरल-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केला जात आहे. शिवाय नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकांनी मगरीला अशा प्रकारे लोखंडी रॉड तोडणे सोपे नसल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी हे दृश्य धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.