Viral video: साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल.
आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये एखाद्या महाकाय अजगराने एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला जिवंत गिळल्याची दृष्यं पाहिली असतील. खास करुन हॉलिवूड चित्रपटांमध्ये असली दृष्यं अनेकदा दाखवली जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका कुत्र्याला घरात जाऊन अजगरानं क्षणात गिळलं आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. घरातील पाळीव कुत्रा रात्री वऱ्हांड्यातील मोरीत शांतपणे झोपलेला होता. इतक्यात एक महाकाय अजगर घरात शिरला आणि त्याने कुत्र्याची शिकार केली.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास मालकीण संध्या देवी तिचा नातू योगेशसोबत घराच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. कुत्री व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात बाथरूमजवळ बसली होती. यादरम्यान अचानक एक अजगर तिथे आला आणि कुत्रीला पाहताच त्याने तिच्यावर हल्ला चढवला.आवाज ऐकून संध्या देवी झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी पाहिलं तर काय अजगराने त्यांच्या जिवंत कुत्रीला गिळंकृत केले आहे. यानंतर महिलेने ताबडतोब अलार्म वाजवला आणि शेजाऱ्यांना बोलवलं. गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत अजगराने कुत्रीला गिळंकृत केले होते. यांनतर ताबडतोब वन रक्षकांना बोलवण्यात आलं त्यानंतर अजगराला सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आलं. सुदैवाने, या भयानक घटनेत कोणत्याही माणसाला इजा झाली नाही.
पाहा व्हिडीओ
हा जगातील सर्वात लांब साप आहे आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ @HimachalW इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.