Viral video: आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा, कारण कधी काय होईल किंवा कधी कुणाची गरज लागेल सांगता येत नाही. तसेच परिस्थिती कधी बदलेल हे सुद्धा कुणाच्या हातात नाही. याची अनेक उदाहरणे आपण याआधीही पाहिली आहेत. दरम्यान आताही एका जिराफाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होतोय. तुम्ही अनेक प्राणी नद्या आणि तलावातील पाणी पिताना पाहिले असेल. सर्व प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला जिराफ पाणी पिताना अगदी जवळून पाहायला मिळेल. लांबलचक जिराफ पाणी कसे पितो हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ज्या जिराफाला त्याच्या उंचीचा गर्व असेल त्याच जिराफाला त्याच्या उंचीमुळे पाणीसुद्धा प्यायला येत नाहीये.

खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जिराफाचा पाणी पिण्यासाठीचा संघर्ष दिसत आहे. जिराफाचे पाय खूप लांब असतात आणि त्याची मानही तितकीच लांब असते. लांब पाय आणि मान यामुळे जिराफाला पाणी पिताना अडचण येत आहे. ज्या उंचीचं सर्वांना कौतुक वाटतं त्याच उंचीचा जिराफाला त्रास होत आहे. अनेक प्रयत्नात जिराफ जवळजवळ हार मानायच्या तयारीत असतानाच तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो. मात्र अनेक अडचणींचा सामना करून आणि पाय पसरल्यानंतर जिराफ पाणी पिण्यात यशस्वी होतो आणि पाणी पितो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेवटी बापाचं काळीज! लेकीच्या पाठवणीला धायमोकलून रडला; भावनिक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ Warriors4Wildlife_Int™ नावाच्या खात्यावर शेअर केला गेला आहे. जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर जवळपास ३ हजार युजर्सनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे. यावर युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले…मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटत आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…निसर्ग सर्वांना समान वागणूक देत नाही. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… “आयुष्यात म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा…”